Wednesday, May 6, 2026
Homeनगरगहू साठेबाजांवर होणार कारवाई

गहू साठेबाजांवर होणार कारवाई

10 मेट्रिक टनाची मर्यादा || पुरवठा विभाग करणार तपासणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सरकारने काळ्या बाजारातील गव्हाच्या साठ्यांवर निर्बंध घालण्यासाठी घाऊक, किरकोळ विक्रेत्यांना 10 मेट्रिक टनापर्यंत मर्यादा घालून दिली आहे. राज्यातील परवानाधारकांना गव्हाच्या साठ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर सादर करणे बंधनकारक करण्यात आली आहे. यानुसार जिल्हा पुरवाठ विभागाकडून गहू साठ्याची तपासणी करत मर्यादेपेक्षा अधिक गव्हाची साठवणूक करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून अधिक गव्हाच्या साठ्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. येत्या 31 मार्चपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. त्यामुळे परवानाधारकांना गव्हाच्या साठ्याची माहिती शासनाच्या पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहेत.

- Advertisement -

यासंदर्भात तपासणी करुन मर्यादेपेक्षा जास्त गव्हाची साठेबाजी करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश शासनाच्या पुरवठा विभागामार्फत जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात पुरवठा विभागामार्फत गहू साठ्याची तपासणी करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या 16 डिसेंबर 2024 रोजीच्या अधिसूचनेनुसार घाऊक, किरकोळ विक्रेता व प्रोसेसर्सकरिता गव्हाच्या साठ्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध 31 मार्चपर्यंत लागू राहणार आहेत. त्यानुसार गहू साठा परवानाधारकांनी गहू साठ्याची माहिती शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घोषित करणे आवश्यक आहे. याबाबतची तपासणी आणि गव्हाच्या साठ्याची पडताळणी जिल्हा पुरवठा विभागाने सुरू केली आहे. यात अधिक साठा असणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

शासनाच्या आदेशानुसार गहू साठा परवानाधारकांनी गहू साठ्याची माहिती शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात गहू साठ्याची तपासणी करण्यात येत आहे. निश्चित करण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा जास्त साठवणूक केल्याचे आढळून आल्यास संबंधितांनी साठा कमी करावा. त्यानंतरही साठा आढळून आला तर कारवाई करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पुरवठा विभागाचे भरारी पथक गहू साठ्याची तपासणी करत आहे. संबंधीतांनाची शासन आदेशाची अंमलबजावणी करावी.
– हेमा बडे, जिल्हा पुरवठा अधिकारी

ताज्या बातम्या

Accident News : माळशेज घाटात बस-स्कॉर्पिओ अपघात; वडाळा-भेंड्यातील अंगणवाडी सेविकेसह चौघांचा...

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa कल्याण-आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे मंगळवार दि. 5 मे रोजी झालेल्या बस आणि स्कॉर्पिओ कारच्या भीषण अपघातात नेवासा तालुक्यातील भेंडा व...