भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीला महत्त्व आहे. मकर संक्रांतीत तिळाला जास्त महत्त्व असते. संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याला प्राधान्य दिले जाते. या तिळाला का महत्त्व आलेय, हे तुम्हाला माहीत आहे का?
एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसे. त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतः पासून विभक्त केले. त्या दोघांना सूर्यदेवांचा राग आला असून त्याने सूर्यदेवास कुष्ठरोगाचा श्राप दिला. त्या श्रापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला. वडिलांना या त्रासात बघून यमराज (हे सूर्यदेवांच्या दुसर्या पत्नी संध्याचे पुत्र होय). यांनी तपश्चर्या केली. त्या तपस्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगांपासून मुक्त झाले. सूर्यदेवांना शनिदेवांचा आणि छाया देवीचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या दोघांचे घर (कुंभ- ही शनीची रास आहे) जाळून टाकले. त्यामुळे त्या दोघांना त्रास सहन करावा लागला. यमराजाला त्यांच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले. त्यांनी आपल्या वडिलांना समजावले. त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटावया त्यांचा घरी गेले.
कुंभ ला पेटविल्यावर फक्त काळे तिळांना सोडून सर्वे काही जळाले होते. त्या काळ्या तिळानेच शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली. त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्याचे दुसरे घर मकर दिले. त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळेच शनी देवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली. त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्व आहे. तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात, कारण ही या दोघांचीही आवडती गोष्ट आहे. मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनिदोष दूर होतात. असे मानले जाते की, तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या शरीरातून झाली होती, त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्व आणखी वाढते. सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूचीही पूजा केली जाते.
काळे कपडे घालण्यामागील कारण – भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला गेला आहे मात्र काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा संक्रांत हा सण एकमेव आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सण ज्या ऋतुमध्ये त्यानुसार परंपरा वेगवेगळ्या असतात. एरवी पुजेत काळा रंग निषीद्ध मानला जातो परंतु संक्रांतीत काळ्या रंगाचं खूप महत्त्व असल्याचं दिसून येतं. जानेवारीतीतल पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या एका राशीतून दुसर्या राशीत संक्रमण होणे याला संक्रांत असं म्हटतात. मकर संक्रांतीला उत्तरायण म्हणून देखील संबोधलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून तिळ तिळ दिवस वाढू लागतो म्हणजे दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप देण्याची परंपरा आहे.
वैज्ञानिक कारण बघायला गेलो तर ज्याप्रकारे पांढरा रंग किंवा हलके रंग जसा उष्णता परावर्तित करतात अर्थात उष्णता शोषून घेत नाही त्याप्रकारे काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. मकर संक्रांत सण हिवाळ्यात येत असल्यामुळे काळ्या रंगाची वस्त्रे शरिराला ऊब देण्यासाठी फायदेशीर ठरतात.
संक्रांतीला तिळाचे महत्त्व का असते ?
