Monday, June 15, 2026
HomeनगरCrime News : पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याने सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

Crime News : पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याने सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार एस. कुलकर्णी यांनी आरोपी पतीस 7 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. मिरीमयी निहार मृधा (वय 35, मुळ रा. चेरा, जि. गडचिरोली, हल्ली रा. वनराई कॉलनी, नवनागापूर, अहिल्यानगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले.

- Advertisement -

मिरीमयी व बबिता मृधा यांचा 2014 मध्ये गडचिरोली येथे प्रेमविवाह झाला होता. मिरीमयी हा अहिल्यानगर येथील एमआयडीसी परिसरात नोकरी करत होता.
विवाहानंतर काही काळानंतर मिरीमयी याने पत्नीवर संशय घेण्यास सुरूवात केली. वारंवार तिचा छळ करत असे. लोखंडी रॉडने मारहाण करणे, जबरदस्तीने दारू पाजणे, अन्न न देणे, केस ओढणे, डोके भिंतीवर आपटणे अशा प्रकारे तो तिला सतत त्रास देत होता. या अमानुष छळाला कंटाळून बबिता मृधा यांनी 28 जुलै 2023 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना त्यांच्या मुलगा कुणाल याने आजीला कळविल्यानंतर 29 जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण 7 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, मयताचा मुलगा कुणाल, तसेच तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हंडाळ व उपनिरीक्षक दीपक पाठक यांच्या साक्षीचा न्यायालयाने विचार केला. या खटल्यात पोलीस अंमलदार यशांजली जपकर व स्वाती गुंजाळ यांनीही सहकार्य केले.

ताज्या बातम्या