Wednesday, May 20, 2026
Homeक्राईममहिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीला भर रस्त्यात छेडले

महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीला भर रस्त्यात छेडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

किराणा दुकानातून घरी परत जाणार्‍या महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीची रस्त्यात छेड काढल्याचा प्रकार रविवारी (दि. 12) दुपारी साडेतीनच्या सुमारास नगर शहरात घडला. याप्रकरणी पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल देठे (पूर्ण नाव नाही, रा. वारूळाचा मारूती, नालेगाव) याच्याविरूध्द विनयभंग, पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादी व फिर्यादीची अल्पवयीन मुलगी रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास किराणा दुकानातून परत येत असताना त्यांच्या ओळखीचा राहुल देठे हा त्याच्या दुचाकीवरून आला. त्याने फिर्यादी व त्यांच्या अल्पवयीन मुलीला थांबवले. फिर्यादीसोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला चिठ्ठीवर त्याचा मोबाईल नंबर देण्याचा प्रयत्न केला. मुलीसोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा मोबाईल नंबर मागितला.

पीडित मुलीने त्याला विरोध केला असता त्याने केस धरून ओढले व जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान या घटनेबाबत फिर्यादीची आई व फिर्यादी यांनी राहुलला जाब विचारला असता त्यांना त्याने तलवारीने मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.

ताज्या बातम्या

Onion : कांदा दर घसरणीची केंद्राकडून गंभीर दखल; उच्चस्तरीय केंद्रीय पथक...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik विक्रमी उत्पादनानंतर कांद्याचे दर अक्षरशः कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना अखेर केंद्र सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. ग्राहक...