Sunday, September 27, 2026
HomeनगरCrime News : खडकीत महिलांच्या दागिन्यांची लूट

Crime News : खडकीत महिलांच्या दागिन्यांची लूट

पोलिसांचा धाक संपला की काय?

अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar

तालुक्यातील खडकी शिवारात शेतात काम करणार्‍या महिलांना लक्ष्य करून सोन्याचे दागिने लुटण्याची आठवडाभरातील दुसरी घटना घडली. शनिवारी(दि.1) स्वाती नवनाथ रोकडे या शेतात घास कापत असताना दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी दमदाटी करून गळा आवळण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या गळ्यातील सुमारे अर्धा तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला. दोन दिवसांपूर्वी संगीता आनंद पासलकर व त्यांची मुलगी केशरबाई नामदेव कोठुळे यांना चाकूचा धाक दाखवून कानातील दागिने व गळ्यातील सुमारे दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते.

- Advertisement -

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतरही पुन्हा घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. खडकीसह सारोळा कासार व घोडकेवाडी परिसरातही अशा घटना घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी शेतरस्त्यांवर गस्त वाढवून संशयित दुचाकीस्वारांची तपासणी करावी व चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खडकीत दोन महिलांचे दागिने चाकूचा धाक दाखवून लुटले. त्याचा स्थळ पंचनामा कालच झाला आणि आज पुन्हा तशीच घटना घडली. चोरट्यांवर पोलिसांचा धाक संपला की काय, अशी शंका निर्माण होत आहे. सारोळा कासार व घोडकेवाडी येथेही अशा घटना घडल्या आहेत. पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करावा; अन्यथा आंदोलन करण्यात येईल. असे खडकीचे सरपंच भाऊसाहेब बहिरट यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Nashik News : ‘महाराष्ट्र शासन’ची पाटी लावून कळवणच्या व्यापाऱ्याचा कांद्याने भरलेला...

0
लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon बाजारात कांद्याच्या (Onion) दराने उसळी घेतली असतानाच, आता कांदा चोरट्यांच्या निशाण्यावर आला आहे. कळवण (Kalwan) येथील एका व्यापाऱ्याचा १२...