Monday, September 28, 2026
HomeनगरAccident News : भरधाव डंपर घरात घुसल्याने महिला गंभीर जखमी

Accident News : भरधाव डंपर घरात घुसल्याने महिला गंभीर जखमी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे मातीने भरलेला भरधाव डंपर थेट घरात घुसल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात घरातील महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, केंदळ- शिलेगाव रस्त्यावर असलेल्या म्हसे वस्तीवर काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिलेगावच्या दिशेने जाणारा मातीने भरलेला डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट सुभाष बबन म्हसे यांच्या घरात घुसला. डंपरने घराच्या तीन भिंती पाडत स्वयंपाकघरात प्रवेश केला. त्यावेळी स्वयंपाकघरात असलेल्या त्यांच्या सुनबाई रोहिणी सचिन म्हसे या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमी रोहिणी म्हसे यांना ढिगार्‍यातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत सुभाष म्हसे यांच्या शेडसह बाथरूम व किचनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे शिलेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भरधाव अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. काल उशिरापर्यंत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू हाते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...