Wednesday, May 6, 2026
HomeनगरKopargaon : महिलांचे शोषण करणारे अशोक खरातचे व्हिडीओ व्हायरल

Kopargaon : महिलांचे शोषण करणारे अशोक खरातचे व्हिडीओ व्हायरल

कोपरगावात तिघांवर गुन्हा दाखल || दोघांना अटक

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण करण्याचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी कोपरगाव येथील दोन जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने पोलिसांनी आंबटशौकिनांना मोठी चपराक दिली आहे.

- Advertisement -

अशोक खरात या भोंदू बाबाबाबत नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे. त्याचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरु आहे. या गंभीर गुन्ह्यातील पिडीत महिलांचे अश्लिल व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत करण्यात येत आहेत. कोपरगाव येथे बीएमव्ही या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर 25 मार्च 2026 रोजी राहुल गंगाधर शिंदे (अनिल कोल्ड्रींग्ज कोपरगाव) याने मोबा. 9960815959 वरुन पिडीत महिलांचे अश्लिल व्हीडीओ प्रसारीत केले. त्यावरून पोलिसांनी तपास केला असता सदरचे व्हिडीओ राहुल शिंदे यास योगेश पंढरीनाथ आढाव, रा. कोपरगाव. मो. 9420640274 याने पाठविले असून योगेश पंढरीनाथ आढाव यास ते व्हिडीओ त्याचा मित्र संदीप गर्जे रा. माजलगाव जि. बीड मो. 9923477556 याने पाठविल्याचे तपासात समोर आले आहे.

त्यावरून आरोपी राहुल गंगाधर शिंदे, योगेश पंढरीनाथ आढाव, संदीप गर्जे या तिघांविरुध्द कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 147/2026 बी.एन.एस. कलम 294 (2), 3 (5) सह माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 67 (अ) प्रमाणे गुन्हा दि. 25 मार्च रोजी दाखल करण्यात आला आहे. आरोपी राहुल गंगाधर शिंदे, योगेश पंढरीनाथ आढाव यांना अहिल्यानगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी संदीप गर्जे याचा शोध सुरु आहे. त्यालाही लवकरात लवकर अटक करण्यात येणार आहे. हे प्रकरण संवेदनशील व गंभीर असून यामध्ये बर्‍याच महिला पिडीत असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने अतिशय संवेदनशीलरित्या व गोपनीयरित्या तिची ओळख उघड होणार नाही याची खबरदारी घेवून तपास करण्यात येत आहे.

सोशल मीडिया धारकांना इशारा
कोणाकडेही पिडीत महिलेची ओळख, तिच्या नातेवाईकांची ओळख, तिच्या घराची ओळख, तिच्या कूटूंबाची ओळख उघड होईल असे व्हिडीओ किंवा अश्लिल व्हिडीओ असल्यास ते तात्काळ डिलीट करावे व ते प्रसार माध्यमांवर प्रसारीत करू नये. असे व्हिडीओ प्रसारीत केल्यास संबंधितांवर व संबंधित प्रसार माध्यमाचे ग्रुप अ‍ॅडमिन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यांना अटक करून कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ६ मे २०२६ – लाल बावट्याचा अस्त

0
भारतीय लोकशाहीच्या पटलावर नुकत्याच उमटलेल्या निवडणूक निकालांच्या लकीरी केवळ सत्तांतराच्या कथा सांगणार्‍या नाहीत, तर त्या देशाच्या राजकीय ध्रुवीकरणाची नवी आणि स्पष्ट दिशा अधोरेखित करणार्‍या...