अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मतदारसंघाची पुनर्रचना व जनगणनेप्रमाणे 2023 चे महिला आरक्षण विधेयक लागू करण्यात येईल, ही भूमिका सर्व राजकीय पक्षांनी मान्य केली होती. त्यावेळी सरकारकडे बहुमत होते. परंतु सध्या सरकारकडे दोनतृतीयांश बहुमत नाही, हे ओळखून विरोधी पक्षातील नेत्यांनी भूमिका बदलली. यातून विरोधकांचा दुटप्पी चेहरा समोर आला आहे, अशी टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तसेच विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाची हत्या कशी केली, यासाठी राज्यभरात मेळावे घेऊन या पापाचे धनी कोण आहेत? हे जनतेसमोर मांडणार आहोत, अशी माहिती पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली.
अहिल्यानगर येथील पालकमंत्री कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सरकारसाठी विरोधीपक्षांची अशी भूमिका नवीन नाही. आमच्या सरकाराने लाडकी बहिण योजना सुरु केल्यानंतर काँग्रेससह शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना यांनी विरोध केला होता. कोणत्याही महिला धोरणाला विरोध करण्याची याची भूमिका आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण देणार अशी ठाम भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिला आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी 1 कोटी स्वाक्षरी मोहिमेचे निवेदन देणार आहेत. तसेच विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाची हत्या कशी केली, यासाठी राज्यभरात मेळावे घेऊन या पापाचे धनी कोण आहेत? हे जनतेसमोर मांडणार आहोत, अशी माहिती पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली.
तनपुरेंच्या कार्यकर्त्यांकडून महायुतीचा प्रचार
माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भाजप उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलेला नाही. याबाबत विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, त्यांच्या पक्ष प्रवेशाची गरज नाही. त्यांनी उमेदवारी अर्ज न भरणे हाच आमच्यासाठी पाठिंबा आहे. त्यांचे कार्यकर्ते गाव पातळीवर महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. एकाही कार्यकर्त्याने वेगळी भूमिका घेतली नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला.
गोदा ते नर्मदा जलयात्रेचामध्य प्रदेशमध्ये समारोप
जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या निमित्ताने, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे आयोजन केले आहे. 25 ते 29 एप्रिलदरम्यान ही यात्रेचे आयोजन असून जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनाचा संदेश देण्यासाठी श्रीक्षेत्र चौंडी आणि श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून सुरू होणार्या यात्रेचा समारोप श्रीक्षेत्र महेश्वर (मध्य प्रदेश) येथे होणार असल्याची माहिती माहिती जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.





