Monday, May 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशस्त्राचा धाक दाखवून महिला भाविकांंना लुटले; सहा संशयित ताब्यात

शस्त्राचा धाक दाखवून महिला भाविकांंना लुटले; सहा संशयित ताब्यात

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar

- Advertisement -

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वत प्रदक्षिणा मार्गावर धाडोशी परिसरात अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेल्या दहा महिला भाविकांना चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून सोने, रोख रकम लुटून नेल्याची घटना घडली आहे.

घोटी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत सहा संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. ब्रह्मगिरी पर्वताची पायी प्रदक्षिणा करत असताना रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत रस्त्यालगतच्या झुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या सहा जणांनी चानक भाविक महिलांसमोर येत कोयते दाखवून जीव मारण्याची धमकी दिली. आरोपींनी पैसे व सोने काढून द्या, अन्यथा ठार मारू अशीधमकी दिली. तसेच महिलांना काठ्यांनी मारहाण केली. या झटापटीदरम्यान महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, रोख रक्कम, पर्स तसेच मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आले. यात एकूण सुमारे १ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

लुटलेल्या ऐवजामध्ये ३५ हजार रुपयांची सोन्याची पोत, पर्समधील ४ हजार रुपये, २८ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ हजार किमतीचा मोबाईल, पर्समधील ३ हजार रुपये तसेच ५ हजार रुपयांचा दुसरा मोबाईल यांचा समावेश आहे. कीर्ती शिंदे, मुक्त्ता शिंदे, चंद्रकला शिंदे, अंजली खाडे यांनी फिर्याद दिली आहे. घोटी पोलिसांनी बारा तासांच्या आत सहा संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली. ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नावे चेतन रामदास गुंड (वय २२, रा. धाडोशी, ता. त्र्यंबक), वैभव रंगनाथ झोले (वय २०, रा. धाडोशी, ता. त्र्यंबक), नवनाथ सुक्रा गुंड (वय २७, रा. धाडोशी, ता. त्र्यंबक), अनिल जाधव (वय २३, रा. झारवड खुर्द, ता. त्र्यंबक), पांडुरंग जाधव (वय २४, रा. झारवड खुर्द, ता. त्र्यंबक) व अमोल गुंड (वय २१, रा. धाडोशी, ता. त्र्यंबक) अशी असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पखालरोडवरील गुलशन कॉलनीतील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर (Girl Student) वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार...