Monday, April 6, 2026
HomeनाशिकWomen Day : महिला खरोखरच सक्षम आहेत?

Women Day : महिला खरोखरच सक्षम आहेत?

नाशिक | डॉ.माधवी गोरे-मुठाळ

महिलादिन हल्ली सप्ताहाच्या स्वरुपात साजरा केला जातो. कुवतीनुसार प्रत्येक जण हा दिन साजरा करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, उत्सवीकरणापलीकडे महिलादिन जाऊ शकत नाही. महिलांची अवस्था अजूनही पूर्वीपेक्षा फारशी वेगळी आणि अजूनही पूवापसा सुधारलेली नाही हे वास्तव आहे.

- Advertisement -

Communities, Countries and Ultimately the Whole World are only as strong as the health of their Women Michelle Obama.

साधारण एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत १९०९ मध्ये पहिला महिलादिन साजरा करण्यात आला. १९२२ पर्यंत त्याला अधिक व्यापक आणि जागतिक स्वरूप प्राप्त झाले. गेल्या काही वर्षांपासून महिलादिन सप्ताहाच्या स्वरुपात साजरा केला जातो. एक-दोन व्याख्यानं, लागेल तेव्हढे रिल्स, फोटो, एखादं कविता संमेलन, पाककृती स्पर्धा यापलीकडे महिलादिनाचे उत्सवीकरण जाऊ शकत नाहीये. महिलांची अवस्था अजूनही १९०९ पेक्षा फारशी वेगळी आणि सुधारलेली नाही. २० वर्षांहून अधिक काळ स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय करताना आणि त्याआधीची आठ वर्षे डॉक्टर बनताना जे अनुभव मला आलेत, त्यानुसार तर महिला आरोग्य साक्षरता अस्तित्वात नाही असंच म्हणावं लागेल.

आता स्त्रीच्या हातात नवऱ्याने दिलेला किंवा स्वतः कमावलेला पैसा आलाय जरूर, पण त्याचा उपयोग जीवनस्तर आणि आरोग्यस्तर उंचावण्यासाठी करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंग, शॉपिंग, ब्यूटी पार्लर, स्किन आणि हेअर ट्रीटमेंट, सोने-चांदी दागिने खरेदी किंवा इतर हौसमौजेला वापरण्याचा कल अधिक आहे. मुळात, देवानं आपल्याला तुलनात्मकरीत्या पुरुषांपेक्षा नाजूक शरीर आणि आरोग्याच्या अनेक समस्या देऊनच जन्म दिलाय हेच तिला उमजलं नाहीये. प्रत्येक स्त्रीने स्वतःला खालील प्रश्न विचारले तर तिचे डोळे लख्ख उघडतील.

माझी शरीररचना आणि माझ्या विशेष अवयवाचं कार्य कसं आहे हे मला माहीत आहे का? आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माझ्या शरीरात भयंकर बदल होतात आणि व्यवस्थित काळजी घेतली नाही तर ते बदल मला कायमचे अशक्त करून टाकतात हे मला माहीत आहे का ? मी जर आजारी पडले तर उपचारपाणी करण्याची धमक माझ्यात (म्हणजे माझ्या कुटुंबाकडे नाही पण माझ्यात) आहे का ? मी सतत लहान-मोठ्या गोष्टींसाठी इतरांवर, त्यांच्या मर्जीवर अवलंबून आहे. हा माझा मिंधेपणा आहे आणि त्याचं उगाचच मी साधी भोळी आहे असं म्हणून, मानून उदात्तीकरण केलं जातंय, हे मला ठाऊक आहे का ?

माझे केस कोणत्या रंगाचे आहेत, चेहेऱ्यावर सुरकुत्या पडल्यात किंवा नाहीत, माझ्याकडे किती साड्या, दागिने आहेत यापेक्षा माझं वजन, बीपी, रक्तशर्करा,काम करण्याची क्षमता किती आहे, मला दम लागतोय का, माझा BMI किती आहे, मी माझ्या वाढत्या वयात होणाऱ्या कॅन्सरसाठीच्या तपासण्या किती प्रामाणिकपणे करते, मी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला ऐकते की माझ्या मैत्रिणीचा ? मी नियमित व्यायाम करते का? मला पुरेशी झोप मिळते का, मी मिळेल ते आणि मिळेल तेव्हा खातेय की सजगपणे खातेय? माझ्या शिक्षणाच्या किंवा कामाच्या ठिकाणी स्वच्छ प्रसाधनगृह, मुबलक पाणी आणि हात धुण्याची सोय आहे का? नसतील तर ते मिळवण्यासाठी मी आवाज उठवत आहे का की ते मिळवणं हा माझा मूलभूत हक्क आहे हेच मला ठाऊक नाहीय?

गाडी चालवताना मी हेल्मेट वापरते, रहदारीचे नियम पाळते की किमान दोन लेकरं, एका हातात हॅण्डल, दुसरा खांदा आणि कानाच्या मध्ये मोबाईल धरून किराणा सामानाची पिशवी ठेवून सर्वसामान्य स्त्री समजानुसार फक्त शंकराचं नाव घेऊन फोनवर बोलत गाडी चालवत मी माझ्यासकट सगळ्यांचे जीव धोक्यात घालते का? चेहरा पूर्णपणे झाकून मला दहशतवादी बनवणाऱ्या स्कार्फमुळे माझा जीव वाचू शकत नाही हे मला माहीत आहे का? असे प्रश्न प्रत्येक स्त्रीला पडायला हवेत आणि तिचे तिने उत्तरं शोधायला हवीत.

ताज्या बातम्या

Kopargaon : सोनेवाडीच्या तरुणाचा कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मृत्यू

0
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi कष्टाने मिळवलेले यश आणि कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला (Mahabaleshwar) गेलेल्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. कोपरगाव...