Thursday, March 13, 2025
Homeदेश विदेशVideo: जगातील सर्वात उंच पुलावर रेल्वेची यशस्वी चाचणी

Video: जगातील सर्वात उंच पुलावर रेल्वेची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जगातील सर्वात उंच पूल अशी ओळख असणारा चिनाब पूल आता लवकरच सुरू होणार आहे. अभियांत्रिकीचा चमत्कार मानल्या जाणार्‍या या पुलावरून रेल्वेची पहिली यशस्वी चाचणी पार पडली आहे. भारतीय रेल्वेने जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलासह सांगलदान ते रियासीपर्यंत पहिली रेल्वे चाचणी करण्यात आली.

भारतीय रेल्वेने गुरुवारी नव्याने बांधलेल्या चिनाब रेल्वे पुलावर ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली. हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे जो रामबन जिल्ह्यातील सांगलदानला रियाशी जोडतो. रेल्वेने रविवारी, १६ जून रोजी चिनाब रेल्वे पुलावर इंजिनची यशस्वी चाचणी घेतली होती. या मार्गावर लवकरच रेल्वे सेवा सुरू होणार आहे.

- Advertisement -

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी (१६ जून) या चाचणीचा व्हिडीओ शेअर केला. “पहिली ट्रायल ट्रेन सांगलदान ते रियासीपर्यंत यशस्वीपणे धावली आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्प (यूएसबीआरएल) जवळपास पूर्ण झाला आहे. केवळ टनेल क्रमांक एकचे काही काम शिल्लक आहे. यूएसबीआरएल प्रकल्प या वर्षअखेरीस पूर्ण होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

जगातील सर्वात उंच पुलावर रेल्वेची यशस्वी चाचणी

चिनाब पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही उंच आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल म्हणून ओळखला जाणारा चिनाब पूल नदीपात्रापासून १,१७८ फूट उंचीवर आहे. याची उंची पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आहे. जम्मू आणि काश्मीरमधील खडतर भूभाग आणि हवामानाच्या परिस्थितीमुळे या पुलाचे बांधकाम आव्हानात्मक मानले जात होते. हा पूल जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील चिनाब पुलाच्या एका घाटावर बांधण्यात आला आहे, याला चिनाब आर्क ब्रिज म्हणूनही ओळखले जाते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Suicide News : मानसिक त्रास व धमक्यांना घाबरून महिलेसह प्रियकराची...

0
नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon फोनद्वारे आणि प्रत्यक्ष शारिरीक सुखाची मागणी करुन तसेच दिलेल्या मानसिक त्रासाला व धमक्यांना कंटाळून तालुक्यातील वंजारवाडी (Vanjarwadi) येथील प्रेमीयुगलाने धावत्या...