येवला | प्रतिनिधी
तालुक्यातील रायते शिवारात असणाऱ्या रवी दीप इंडस्ट्रीज या प्लायवूड व दरवाजे, फर्निचर तयार करणाऱ्या कंपनीला अकस्मात आग लागून सुमारे 12 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
आज, पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास कंपनीला अकस्मात आग लागली. या आगीत कंपनीतील यंत्रसामुग्रीसह कच्चामाल तयार माल, सोलर आदी सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही वा कुणाला इजा झाली नाही. घटनेच्या वेळी कंपनीतील ३५ कर्मचारी कंपनीच्या निवासस्थानात झोपलेले होते.
“हा अपघात धुक्याने झाला की धोक्याने? सरकार संशयाचं भूत नाचवतय”; राज ठाकरेंचा सरकारला सवाल
पहाटे उठलेल्या एका कामगाराला आग लागल्याचे दिसतच त्याने इतर कामगारांना उठवले. मालक विष्णू पुंजाजी खैरनार रा. येवला घटनेची माहिती कळवून सर्व कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु आग वाढतच गेल्याने येवला, कोपरगाव, मनमाड, चांदवड, पिंपळगाव बसवंत येथील अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. दुपारपर्यंत आग विझवण्याचे काम सुरूच होते. दरम्यान, घटनेचा कामगार तलाठी बाविस्कर यांनी पंचनामा केला आहे.




