मुंबई | Mumbai
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची एफआयआर दाखल करून चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून केली जात असताना आज रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन या विषयी सखोल चर्चा केली. तसेच, या लढ्यात राज ठाकरे हे पूर्ण ताकदीनिशी आमच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वासही व्यक्त केला होता. त्यानंतर, आता राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांच्या भूमिकेवर परखडपणे भाष्य केले. पोलीस रोहित पवारांचा FIR का घेत नाहीत, सरकारच संशयाची भूतं नाचवतंय, असे म्हणत सरकारला लक्ष्य केले.
हा अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला हे महाराष्ट्राला समजत नाही
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, हा अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला हे महाराष्ट्राला समजत नाही. रोहित पवार यांनी या प्रकरणातील मुद्दे, तांत्रिक गोष्टी सांगितल्या. मात्र, त्यांचा एफआयआर का दाखल करून घेतला जात नाही, चौकशी नीट व्हावी यासाठी एफआयआर करायचा असेल तर अडथळे का निर्माण केले जात आहेत, असा खडा सवाल राज यांनी केला.
मगर सरकार का अडखळे आणत आहे?
राज ठाकरे म्हणाले, मरीन ड्राईव्हला एक अधिकारी FIR लिहित होते, मग डीसीपी आले आणि म्हणाले की तक्रार घ्यायची नाही, हे काय आहे? जर त्यांच्या कुटुंबातून कोणाला तरी तक्रार द्यायची आहे, मग सरकार का अडथळे आणत आहे? सुनेत्रा वहिनी ह्या आता सरकारमध्ये आहेत. राज्यात सांगितले जाते की कुठेही FIR नोंदवू शकता. पण FIR नोंदवायला गेलेला माणूस त्याची तक्रार घेतली जात नाही मग यातच काळ बेरं आहे का? असे सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.
“महाराष्ट्रात मराठी माणसाची तक्रार…”; राज ठाकरेंसोबतच्या भेटीत रोहित पवारांनी मांडली व्यथा
राज ठाकरे यांनी विशेषतः एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते, एखाद्या घटनेची सखोल चौकशी व्हावी यासाठी संबंधितांकडून तक्रार दाखल केली जात असेल, तर ती स्वीकारण्यास अडथळे का आणले जात आहेत? “जर हा केवळ अपघात असेल आणि घातपाताचा प्रश्नच नसेल, तर एफआयआर नोंदवण्यास सरकार का कचरत आहे?” असा थेट सवाल त्यांनी केला.
सरकार संशयाची भूत नाचवत आहे
ब्लॅक बॉक्सचेही अजून काही कळले नाही, वितळून कितीही विस्कळीत झाले तरी ब्लॅक बॉक्सला काही होत नाही. पण, सरकार संशयाची भूत नाचवत आहे. सरकार का FIR नोंदवू देत नाही, सगळ्या टेक्निकल गोष्टी बाजूला ठेवल्या पण FIR का नोंदवू घेतला जात का नाही? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. आमदारांचा FIR पोलीस घेत नाहीत, मग सर्वसामान्यांचा काय?
कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवत होता, कोणी ओढत होता; रोहित पवारांनी नेमकं कोणाला दम भरला?
आमदार असून एफआयआर घेत नसतील सामान्य माणसाचं काय
रोहित पवार आमदार असून एफआयआर घेत नसतील सामान्य माणसाचं काय, अशी उद्ग्विनता त्यांनी व्यक्त केली. हा अपघात दु्र्देवी आहे. सुनेत्रा पवार सरकारमध्ये आहेत, त्यांनीदेखील याबाबत बोलायला हवं, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.




