Monday, June 22, 2026
Homeक्राईमCrime News : बहिणीच्या सासरच्यांकडून घरात घुसून हल्ला; युवक जखमी

Crime News : बहिणीच्या सासरच्यांकडून घरात घुसून हल्ला; युवक जखमी

प्रेमविवाहातून वाद || श्रीरामपूरच्या चौघांविरूध्द नगरमध्ये गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बोल्हेगाव येथील गणेश चौक परिसरात एका युवकावर त्याच्या बहिणीच्या सासरच्यांनी घरात घुसून लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (10 जून) मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास घडली आहे. यश आदिक भोसले (वय 18) असे जखमी युवकाचे नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

यश याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याची बहिण आकांशा हिने सुमारे सात महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करून कोर्ट मॅरेज पध्दतीने राजेश शशिकांत कुमावत (रा. वॉड नं. 7, श्रीरामपूर) याच्याशी लग्न केले होते. मात्र विवाहानंतर तिचे सासरच्यांशी वाद निर्माण झाले होते. त्यामुळे आकांशा गेल्या तीन दिवसांपासून माहेरी राहत होती. मंगळवारी रात्री 1.30 च्या सुमारास आकांशाची नणंद पूजा शशिकांत कुमावत, पती राजेश कुमावत, सासू संगीता शशिकांत कुमावत (सर्व रा. वॉड नं. 7, श्रीरामपूर) आणि एक सिध्दू (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हे चौघे मिळून यशच्या घरी आले.

त्यांनी आकांशाला तु माहेरी कशासाठी आली आहे असे बोलून बचत गटाच्या पैशांच्या कारणावरून वाद घालायला सुरूवात केली. यावेळी पूजा हिने यशच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली, तर इतर तिघांनी त्याच्या आई कविता, बहिण रूतुजा आणि आकांशालाही शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन ते चौघे घटनास्थळावरून पळून गेले. यशला लगेचच उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : गावठी कट्ट्यासह सराईत आरोपी जेरबंद

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB Police) मोठी कारवाई करत श्रीरामपूर येथील हरेगाव (Haregaon) रोडवरील एस कॉर्नर...