Saturday, September 26, 2026
HomeनगरCrime News : तरुणाला बेदम मारहाण; सहा आरोपी अटकेत

Crime News : तरुणाला बेदम मारहाण; सहा आरोपी अटकेत

वडिलोपार्जित घराच्या वादातून हल्ला || दोन अनोळखी आरोपी फरार

बेलवंडी |वार्ताहर| Belwandi

वडिलोपार्जित घराच्या जुन्या वादातून अक्षय प्रभाकर जाधव (25, रा. येवती, ता. श्रीगोंदा) यांना काठ्या व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. गणेश अशोक जाधव (21, येवती), मोनू उर्फ परवेज मुनीर मनियार (23, देवदैठण), पवन सागर भंडारे (20, पिंपरी कोलंदर), मोनू उर्फ अनिकेत लक्ष्मण धोंगडे (26, शिरूर), तेजस राजू सुर्वे (21, गोलेगाव) व पंकज झाडू मेश्राम (18 वर्षे 5 महिने, तरडोबाचीवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. आणखी दोन अनोळखी आरोपी फरार आहेत. दि. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अक्षय जाधव हे ढवळगाव फाटा येथील भाजीपाला दुकानात असताना चुलत भाऊ व त्याच्या साथीदारांनी त्यांना मारहाण केली. जाधव गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन सूचना दिल्या.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानंतर शिरूर, गोलेगाव व ढवळगाव परिसरात शोधमोहीम राबवून सहा आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे, पोलीस हवालदार भाऊसाहेब यमगर, पोलीस नाईक शरद गांगर्डे, पोलीस कर्मचारी दादासाहेब क्षिरसागर, विनोद पवार, योगेश भापकर व मोबाईल सेलचे पोलीस कर्मचारी राहुल सांगळे यांनी केली. पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाणे करीत आहे.

ताज्या बातम्या

Trimbakeshwar Simhastha News : त्र्यंबकेश्वरमध्ये तयारीला वेग; सिंहस्थाच्या ध्वजारोहण समारंभास राष्ट्रपती...

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar महाराष्ट्रातील नागा साधूंचे एकमेव कुंभमेळा क्षेत्र आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचे मुख्य केंद्र असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे आगामी कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची उत्सुकता...