अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
दोन अनोळखी व्यक्तींनी तरुणाला लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना पाईपलाईन रोडवरील रावसाहेब पटवर्धन बँकेसमोर मंगळवारी मध्यरात्री घडली. सागर चंदर शिंदे (वय 28 रा. शिंदेनगर, वैदवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- Advertisement -
त्यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून दोन अनोळखी व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर शिंदे हे त्यांच्या दुचाकीवरून रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास पाईपलाईन रोडने घराकडे जात असताना रावसाहेब पटवर्धन बँकेसमोर डिव्हायडरजवळ झाडाझुडूपात लपून बसलेल्या दोन अनोळखींनी शिंदे यांच्या दुचाकीचा वेग कमी होताच त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने शिंदे दुचाकीच्या खाली कोसळले.