Friday, April 17, 2026
Homeक्राईमSangamner : तरुणाला मारहाण करत पुलावरुन ढकलले

Sangamner : तरुणाला मारहाण करत पुलावरुन ढकलले

संगमनेरातील प्रकार || शहर पोलिसांत गुन्हा दाखल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शहरातील एका कापड दुकानात काम करुन घरी जाणार्‍या तरुणाला तिघांसह अनोळखी दोन ते तीन जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करुन आणि कोयत्याचा धाक (Koyata Fear) दाखवून पाच हजार रुपये काढून घेतले. तसेच कोयत्याने डोक्यावर आणि दगडाने पाठीवर मारुन दुखापत केली. त्यानंतर म्हाळुंगी नदीवरील पुलावरुन ढकलून देत जीवे ठार मारण्याची धमकी (Threat) दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी संगमनेर (Sangamner) शहर पोलिसांनी तिघांसह अनोळखी दोन ते तीन जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कापड दुकानात काम करणारा शुभम सुरेश भोईर (वय 28) हा रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास काम आवरुन घोडेकर मळा येथील घरी चव्हाणपुरा मार्गे मोटारसायकलवरुन चालला होता. त्यावेळी म्हाळुंगी नदीवरील पुलावर साई सूर्यवंशी, अतुल सूर्यवंशी (दोघेही रा. अकोले नाका) व अनिकेत मंडलिक (रा. माळीवाडा) यांच्यासह अनोळखी 2 ते 3 जण थांबलेले होते. त्यांनी पुलावर गाडी थांबवून चावी काढून घेत पैसे मागितले. तेव्हा त्यांना पैसे नसल्याचे सांगितल्याचा राग आल्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली.

साई सूर्यवंशी याने कपड्याच्या आत लपवलेला लोखंडी कोयता काढून धाक दाखवत खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले. तसेच कोयत्याने डोक्यावर मारत दुखापत केली. याचबरोबर अनिकेत मंडलिक याने जवळ पडलेला दगड उचलून पाठीत मारला. सोबत असलेल्या इतर दोन ते तीन जणांनी देखील शिवीगाळ करुन मारहाण केली.

दरम्यान, आरडाओरड ऐकूण जवळील एका महिला आली. त्यावेळी आमच्या विरुद्ध तक्रार दिली तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी (Threat) देवून पळून गेले. त्यानंतर सदर महिलेने जखमी अवस्थेत शुभमला घरी नेले. याप्रकरणी शुभम भोईर याने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी तिघांसह अनोळखी दोन ते तीन जणांवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत हे करत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पुनर्रचनेत नगर जिल्ह्यात आणखी एक लोकसभा मतदारसंघ?

0
नवी दिल्ली | New Delhi केंद्र सरकारने गुरुवारी संसदेत परिसीमनशी संबंधित दोन महत्त्वाची विधेयके सादर केली. यावेळी जागावाटपावरून होणारी चर्चा अधिक तीव्र झाली आहे, कारण...