Thursday, September 10, 2026
Homeक्राईमCrime News : भांडणे सोडविण्यास गेलेल्या तरूणावर चॉपरने वार; चार जणांवर गुन्हा...

Crime News : भांडणे सोडविण्यास गेलेल्या तरूणावर चॉपरने वार; चार जणांवर गुन्हा दाखल

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

भावाला मारहाण करत असल्याचे समजताच भांडणे सोडविण्यासाठी गेला असता आरोपींनी शिवीगाळ करत एका तरूणावर चॉपरने वार करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी शहरात घडली. गोपाल जगधने (वय 25 वर्षे) हा तरुण राहुरी शहरातील लक्ष्मीनगर येथे राहत आहे. दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 4.45 वाजे दरम्यान गोपाल जगधने हा घरी असताना त्याला समजले की, शहरातील शनीचौक येथे त्याच्या भावाशी काही तरुण भांडण करत आहेत. सदर भांडण क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झाले होते.

- Advertisement -

त्यामुळे गोपाल जगधने शनीचौक येथे गेला आणि भांडण सोडवत होता. तेव्हा आरोपींनी गोपाल जगधने या तरुणावर चापरने सपासप वार करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, तुम्ही आमचे नादी लागले तर तुम्हा दोघा भावांना जीवे ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली. काही तरुणांनी गंभीर जखमी झालेल्या गोपाल जगधने याला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याने पोलिसांसमक्ष दिलेल्या जबाबावरून आरोपी राजू भाऊसाहेब जगधने, गौरव नितीन जगधने, अनुग्रह राजू जगधने रा. लक्ष्मीनगर, राहुरी तर शुभम खरात, रा. कोर्टाच्या पाठीमागे, राहुरी, या चार जणांवर गु.र.नं. 1123/2025 भारतीय दंड संहिता कलम 118 (1), 115 (2), 351 (2), 352, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : तुमचा होतो खेळ, शिक्षकांचा जातो जीव!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक तुमचा होतो खेळ, आमचा जातो जीव’ अशी एक उक्ती आपण अनेकदा ऐकत असतो. दोन बड्यांच्या वादात...