Tuesday, September 15, 2026
Homeक्राईमNashik Accident News: नाशकात सर्व्हिसरोडवर हिट अँड रन; आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Nashik Accident News: नाशकात सर्व्हिसरोडवर हिट अँड रन; आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी
मुंबई नाका परिसरातील सर्व्हिस रोड पुन्हा एकदा महामार्ग बनू लागल्याचे वास्तव समोर आले आहे. गोविंदनगरजवळील डेटा मॅट्रिक्स इमारतीसमोर भरधाव आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत किरण चांगदेव नरोडे (३३, रा. गणेशनगर, पिंपळगाव बसवंत) या दुचाकीस्वाराचा करुण अंत झाला आहे. अपघातानंतर मदत करण्याऐवजी पळ काढणाऱ्या चालकावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर अवजड आणि भरधाव वाहनांच्या वाढत्या धोक्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Nashik News: चक्का नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हॉट्स ॲप बिझनेस अकाउंट; थायलंडच्या क्रमांकावरुन…

- Advertisement -

किरण नरोडे हे सोमवारी (दि. १४) दुपारी साडेचार वाजेच्या पल्सर दुचाकीने सर्व्हिस रोडने मुंबईकडून धुळ्याच्या दिशेने प्रवास करत होते. डेटा मॅट्रिक्स इमारतीसमोर पोहोचताच मागून आलेल्या अज्ञात आयशर टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, किरण यांच्या डोक्याला आणि उजव्या हाताला अत्यंत गंभीर दुखापत झाली माहिती मिळताच किरण यांचे बंधू सुरेश नरोडे यांनी प्रत्यक्षदर्शीच्या मदतीने गंभीर जखमी किरण यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. गांगुर्डे यांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर पसार झालेल्या चालकाविरुद्ध मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार टेमगर तपास करत असून, परिसरातील सीसीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आयशर व चालकाचा माग काढला जात आहे.

ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil : दुपारपर्यंत परवानगी न मिळाल्यास…; अंतरवालीतून निघताना जरांगेंचा...

0
मुंबई । Mumbai मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज १८ वा दिवस उजाडला आहे. प्रकृती खालावत असली...