Monday, May 4, 2026
HomeनगरAhilyanagar : फाशीच्या रिलच्या नादात बसला फास..पुढे घडलं असं काही !

Ahilyanagar : फाशीच्या रिलच्या नादात बसला फास..पुढे घडलं असं काही !

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणार्‍या वेटरने (Waiter) रील बनविण्यासाठी एका झाडाला फेटा बांधला आणि त्याच्या मामाला व्हिडिओ (Reel Video) काढण्यास सांगितला. गळफास (Suicide) घेण्याचा प्रयत्न करत असताना काही क्षणांत त्यास फास बसला. मामाने तातडीने फेट्याची गाठ दगडाने तोडली आणि त्यास खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने युवकाचे प्राण वाचले आहेत.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी, जामखेड (Jamkhed) शहरातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा युवक प्रकाश भीम बुडा (वय 17, रा. नेपाळ) (Nepal) आणि त्याचा मामा मिलन बुडा (रा. नेपाळ) हे दोघे फाशी घेताना रील काढण्यासाठी फेटा घेऊन मंगळवारी (दि.10) सकाळी सातच्या सुमारास जामखेड करमाळा रस्त्यावरील खटकळी परीसरात गेले. तेथे असलेल्या झाडाच्या (Tree) फांदीला प्रकाश बुडा याने फेटा बांधला, गळफास तयार केला आणि मामाला व्हिडिओ काढायला सांगितले. गळफास गळ्यात घातला.

मात्र, त्याला खरोखरच फास बसला. क्षणार्धात त्याचे गुडघे जमिनीवर टेकले. व्हिडिओ काढणार्‍या मामाने प्रसंगावधान राखून फेट्याची गाठ दगडाने तोडली तोपर्यंत प्रकाश बुडा बेशुद्ध झाला. नातेवाईक मामा याने हॉटेल मालकास फोनवर घडलेली घटना सांगितली. त्यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना रुगणवाहिका घेऊन बोलवले आणि उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर युवक शुद्धीवर आला.

दरम्यान, रील बनवण्यासाठी (Reel Video) जीवावर बेततील असे धोकादायक स्टंट करू नये, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पखालरोडवरील गुलशन कॉलनीतील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर (Girl Student) वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार...