Sunday, November 3, 2024
Homeक्राईमझेंडीगेटच्या कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा

झेंडीगेटच्या कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

झेंडीगेट परिसरातील कारी मस्जिद शेजारी एका पत्र्याच्या शेंडमध्ये सुरू असलेल्या कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांनी सोमवारी (14 ऑक्टोबर) दुपारी छापा टाकला. सदर ठिकाणाहून 85 किलो गोमांस, वजन काटा, चाकू असा 17 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अंमलदार सुजय हिवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहसिन मुस्ताक कुरेशी (वय 36 रा. सदर बाजार, भिंगार) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

झेंडीगेट परिसरातील कारी मस्जिद शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे, पोलीस अंमलदार इनामदार, लोळगे, सुरज कदम यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी दुपारी 1:20 वाजेच्या सुमारास छापा टाकला असता तेथे मोहसिन मुस्ताक कुरेशी हा गोवंशीय जनावरांची कत्तल करताना मिळून आला. त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून 85 किलो गोमांस, वजनकाटा, चाकू असा 17 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या