Wednesday, February 19, 2025
Homeनगरझेंडीगेटच्या कत्तलखान्यावर एलसीबीची पहाटेच धाड

झेंडीगेटच्या कत्तलखान्यावर एलसीबीची पहाटेच धाड

सव्वा नऊ लाखांच्या मुद्देमालासह चौघे ताब्यात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

झेंडीगेट येथील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी पहाटे छापेमारी केली. गोवंशीय जनावरांची कत्तल करणार्‍या चौघांना ताब्यात घेतले. तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. तीन लाख 26 हजार रुपये किमतीचे एक हजार 630 किलो गोमांस, एक लाख दोन हजारांची सहा जनावरे, लोखंडी सत्तुर व वाहन (एमएच 16 सीसी 9410) असा एकुण नऊ लाख, 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

सात जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्तमश अब्दुल कुरेशी (वय 25, रा. व्यापारी मोहल्ला, रा. झेंडीगेट), इरफान सय्यद मोहम्मद हनीफ (वय 30, रा. कोठला, झेंडीगेट), अरकान असीफ कुरेशी (वय 23, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट), अश्रफ शौकत खान (वय 26, रा. झेंडीगेट) यांना ताब्यात घेतले असून फैजान इद्रीस कुरेशी, सुफियान उर्फ कल्लु इद्रीस कुरेशी व शोएब अब्दुल रऊफ कुरेशी हे पसार झाले आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध गोमांस विक्री व्यावसायिकांविरूध्द कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माहिती काढली असता झेंडीगेट परिसरातील व्यापारी मोहल्ला येथील सरकारी शौचालयाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्तीं गोवंशीय जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी डांबुन ठेवले आहे. त्यांची कत्तल करत आहे, अशी माहिती मिळाली. दरम्यान, माहिती मिळताच पथकाने रविवारी पहाटे सदर ठिकाणी छापा टाकला असता गोवंशीय जनावरांची कत्तल करताना चौघे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले तर तिघे पसार झाले. मिळून आलेल्या चौघांच्या ताब्यातून मुद्देमाल ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

भिंगारमधील मटका अड्ड्यांवर कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिंगार कॅम्प हद्दीतील पाच ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापे टाकले. बुर्‍हाणनगर, वडारवाडी, बाराबाभळी आदी ठिकाणी ही कारवाई केली. याप्रकरणी पाच जणांविरूध्द कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेश गोरख गाडेकर (वय 40, रा. नागरदेवळे), राजू भाऊराव पवार (वय 50 रा. नेहरू कॉलनी, भिंगार), विजय संपत पवार (वय 38, रा. नागरदेवळे), शिवाजी दिनकर धिवर (वय 42, रा. भिंगार), मंगेश सखाराम खरे (वय 39, रा. भिंगार) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या