Thursday, April 2, 2026
HomeनगरJamkhed : झिक्रीला पाच जणांवर जीवघेणा हल्ला

Jamkhed : झिक्रीला पाच जणांवर जीवघेणा हल्ला

9 ते 10 जणांवर गुन्हा दाखल || वाहनांची तोडफोड

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

पंचायत समितीमध्ये माझी तक्रार करता काय, असे म्हणून दमदाटी करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. याची तक्रार दोन दिवसांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली. याचा राग मनात धरून नऊ ते दहा जणांनी तलवार, कोयता, रॉड, काठीने पाच जणांना मारहाण करून जखमी केले. चारचाकी गाडीचे नुकसान करत शिवीगाळ, दमदाटी केल्याची फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. सरपंच पतीसह चार व्यक्तींवर झालेल्या हल्यामुळे झिक्री परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

फिर्यादी मिलिंद श्रीधर जीवडे यांनी दिलेल्या फिर्यादनुसार आरोपी योगेश बापुराव इथापे, घनश्याम सोनबा कसाब, ऋषीकेश शिवाजी साळुंके, मयुर घनश्याम कसाब (सर्व रा. झिक्री ता. जामखेड), अतुल जनार्धन कसाब रा. चौंडी ता. जामखेड व इतर 4 ते 5 जण अशा नऊ ते दहा जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीधर जीवडे, मुकुंद जिवडे, सागर जिवडे, दत्तात्रय साळुंके, प्रविण रामभाऊ साळुंके हे मारहाणीत जखमी झाले आहेत. जखमी जामखेड येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी करत आहेत.

ताज्या बातम्या

Accident News : पिकअपच्या धडकेत शिर्डी विमानतळाच्या दोन कर्मचार्‍यांचा जागीच मृत्यू

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील लोणी-आडगाव रोडवर मंगळवारी रात्री एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणार्‍या पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने शिर्डी विमानतळावर कार्यरत...