Tuesday, April 7, 2026
HomeनगरAhilyanagar : झेडपी, पं. स. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द

Ahilyanagar : झेडपी, पं. स. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द

3 हजार 689 मतदान केंद्र || 30 लाख 7 हजार 404 मतदार, हरकतींसाठी मुदत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारूप मतदार यादी तयार करण्यात येऊन ती बुधवारी (8 ऑक्टोबर) प्रसिध्द करण्यात आली आहे. यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना 14 ऑक्टोबरपर्यंत संबंधित तहसील कार्यालयात लेखी सादर करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी केले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 3 हजार 689 मतदान केंद्र राहणार असून 30 लाख 7 हजार 404 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात निरीक्षणासाठी व पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी त्यांच्या सूचना व हरकती विहित वेळेत दाखल कराव्यात. विहित वेळेनंतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार केला जाणार नसल्याचेही कळविण्यात आले आहे.

तालुकानिहाय मतदान केंद्र संख्या व मतदारांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसात मतदान केंद्र संख्याः अकोले- 2 लाख 11 हजार 852 (270), संगमनेर- 3 लाख 45 हजार 528 (424), कोपरगाव- 1 लाख 90 हजार 782 (207), श्रीरामपूर- 1 लाख 57 हजार 735 (175), राहाता- 2 लाख 7 हजार 868 (220), राहुरी- 2 लाख 6 हजार 873 (231), नेवासा- 2 लाख 67 हजार 548 (320), नगर- 2 लाख 64 हजार 681 (318), पारनेर- 2 लाख 38 हजार 326 (332), पाथर्डी- 2 लाख 1 हजार 905 (250), शेवगाव- 1 लाख 77 हजार 484 (210), कर्जत- 1 लाख 93 हजार 820 (262), जामखेड- 1 लाख 6 हजार 22 (136), श्रीगोंदा- 2 लाख 36 हजार 980 (334).

पालिकांची प्रारूप मतदार यादीही प्रसिध्द
जिल्ह्यात 11 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच प्रभागनिहाय आरक्षण देखील जाहिर करण्यात आले आहे. श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, देवळाली प्रवरा, राहाता, शिर्डी, राहुरी, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा या नगरपरिषदा व नेवासा नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवारी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून त्या-त्या नगरपरिषदेमध्ये प्रभागनिहाय प्रसिध्द केली आहे. 13 ऑक्टोबरपर्यंत हरकत व सुचना घेण्यास मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 28 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अविनाश शिंदे हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप; अकरा लाखांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik इंदिरानगर भागातील (Indiranagar Area) बापू बंगला परिसरातील प्रसिद्ध 'सुपर ग्राहक बाजार'चे मालक अविनाश शिंदे यांच्या निघृण हत्या आणि लूट प्रकरणाचा...