Monday, February 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजZP Election Result 2026 : सोशल मीडियावर 'पॉवर' फुल पण निवडणुकीत 'हवा'...

ZP Election Result 2026 : सोशल मीडियावर ‘पॉवर’ फुल पण निवडणुकीत ‘हवा’ गुल; ‘या’ उमेदवारांना मतदारांनी नाकारले

मुंबई | Mumbai

राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचा (Zilla Parishad and Panchayat Samiti) निकाल आज (सोमवारी) जाहीर होत आहे. या निवडणुकीत आजी-माजी आमदारांनी आपले वारसदार रिंगणात उतरवले होते. यात काहींचा विजय झाला तर काहींना पराभवाचा धक्का बसला. तसेच सोशल मिडीयावर प्रचंड फॅन फॉलोअिंग असणार्‍यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : ZP Election Result 2026 : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुतीच्या २७ जागा बिनविरोध

YouTube video player

यात पुण्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले (Nirmala Navale) यांचाही समावेश असून, त्यांचा ३०० मतांनी पराभव झाला आहे. नवले राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर पंचायत समितीच्या (Shirur Panchayat Samiti) कारेगाव कान्हूर मेसाई गणातून निवडणुकीसाठी उभ्या होत्या. त्यांचा भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी ३०० मतांनी पराभव केला. हा निर्मला नवले आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हे देखील वाचा : ZP Election Result 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ समित्यांसाठी मतमोजणीला सुरूवात

तसेच आंदोलनाच्या वेगवेगळ्या स्टाईलमुळे महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील फुलंब्री गावचे सरंपच मंगेश साबळे (Mangesh Sable) यांचाही पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे पक्षाकडून वडोदा बाजार गटातून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या साबळे यांचा भाजपचे गोपाल वाघ यांनी ११५० मतांनी पराभव केला. तर राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर (Sakshna Salgar) यांचा धाराशिव जिल्ह्याच्या तेर जिल्हा परिषद गटातून पराभव झाला आहे. भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी सलगर यांना पराभूत केले. याशिवाय परभणीच्या बनवस जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणारे पवन करवर (Pavan Karvar) यांचाही पराभव झाला आहे.

हे देखील वाचा : ZP Election Result 2026 : सोलापुरात राष्ट्रवादीचे खासदार मोहिते, आमदार जानकरांना धक्का; भाजपने उधळला गुलाल, राम सातपुतेंच्या पत्नीचा विजय

दरम्यान, सलगर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भावजयीला निवडून आणलं असे म्हणत खासदार निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांनी भाजप उमेदवाराला समर्थन केल्याचा आरोप केला आहे. तसेच ओमराजेंचं गावकी पेक्षा भावकीवर जास्त लक्ष असल्याची टीकाही त्यांनी केली. अप्रत्यक्ष रित्या सलगर यांनी कैलास पाटील यांच्यावर भावजय अर्चना पाटील यांना विजयी करण्यास मदत केल्याचा आरोप केला आहे.

हे देखील वाचा :  ZP Election Result 2026 : धाराशिवात एका मताने पलटली बाजी! ठाकरे सेनेकडून भाजप उमेदवाराचा पराभव

ताज्या बातम्या

निर्मला

ZP Election Result: सोशल मीडियावर लोकप्रिय, पण निवडणुकीच्या मैदानात अपयश; माजी...

0
शिरुर | Shirurसोशल मिडीयावर प्रचंड फॅन फॉलोअिंग असणाऱ्या शिरुर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना यंदाच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे....