Saturday, May 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजZP Election Result 2026 : धाराशिवात एका मताने पलटली बाजी! ठाकरे सेनेकडून...

ZP Election Result 2026 : धाराशिवात एका मताने पलटली बाजी! ठाकरे सेनेकडून भाजप उमेदवाराचा पराभव

आमदार तानाजी सावंतांच्या पुतण्याचाही विजय

धाराशिव | Dharashiv

राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५पंचायत समित्यांचा निकाल आज (सोमवार)जाहीर होत आहेत. यामधील धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv District) ढोकी पंचायत समिती गणातून ठाकरे सेनेच्या उमेदवाराचा अवघ्या एका मताने विजय झाला असून, भाजपच्या उमेदवाराला डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : ZP Election Result 2026 : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुतीच्या २७ जागा बिनविरोध

धाराशिवमधील ढोकी पंचायत समिती गणातून (Dhoki Panchayat Samiti Gan) शिवसेना ठाकरे गटाचे अमर समुद्रे (Amar Samudre) विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे निहाल काझी यांचा एका मताने पराभव केला. समुद्रे यांना ३१८७ तर काझी यांना ३१८६ मते मिळाली. त्यामुळे निहाल काझी यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. ढोकी गणात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पहायला मिळत होती. मात्र, मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात अमर समुद्रे यांनी निसटता पण ऐतिहासिक असा विजय मिळविला.

हे देखील वाचा : ZP Election Result 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ समित्यांसाठी मतमोजणीला सुरूवात

दरम्यान, माजी मंत्री आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे पुतणे धनंजय सावंत धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जवळा गटातून २१८७ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. तसेच धनंजय सावंत यांना भाजपने देखील पाठिंबा दिला होता. धाराशिवमधील भाई उद्धवराव शासकीय आयटीआयमध्ये जिल्हा परिषदेचे ५५ सदस्य आणि पंचायत समितीच्या ११० सदस्यांसाठी ही मतमोजणी (Vote Counting) पार पडली. १५ टेबलांवर ही मजमोजणी झाली असून, त्यासाठी १५० शासकीय अधिकारी काम करत होते.

हे देखील वाचा : ZP Election Result 2026 : सोलापुरात राष्ट्रवादीचे खासदार मोहिते, आमदार जानकरांना धक्का; भाजपने उधळला गुलाल, राम सातपुतेंच्या पत्नीचा विजय

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...