Wednesday, December 4, 2024
Homeनगरप्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे वेळापत्रक ठरले

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे वेळापत्रक ठरले

अखेर ग्रामविकास विभागाकडून निघाले आदेश

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदलांचे वेळापत्रक अखेर ठरले आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून जिल्हा अंतर्गत बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांच्या संघटनांनी शिक्षकांच्या बदल्या नियोजित वेळेप्रमाणे करा अशी विनंती शासनाला केली होती. मात्र शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे बदल्या होणार किंवा कसे? असा प्रश्न निर्माण झाला होता.अखेर आज ग्रामविकास विभागाच्यावतीने राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याबाबत आदेशित केले आहे.

- Advertisement -

ग्रामविकास विभागाच्यावतीने पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे, की जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण जून 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविण्यात येत आहे. तसेच उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल अवमान याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाईन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी विहीत वेळापत्रकानुसार कार्यान्वित असावे, असे निर्देश दिलेले आहेत.

तननुषंगाने दरवर्षी राबविण्यात येणार्‍या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रीयेसाठी सर्वसाधारणपणे संचमान्यतेची प्रक्रीया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिध्द करण्याची कार्यवाही करावी.

तद्नंतर वेळापत्रकानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात यावी. यासाठी शिक्षकांनी संकेतस्थळावर माहिती नोंदविल्यानंतर कोणत्याही प्रकारचे बदल करता येणार नाहीत. शिक्षकांना बदली संदर्भातल्या प्रक्रियेची माहिती स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षकाने बदलीसाठी माहिती भरल्यानंतर शिक्षकांना नंतर कोणताही बदल करता येणार नाही. बदली प्रक्रियेमध्ये शिक्षकाने चुकीची माहिती भरल्यास संबंधित शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश पत्रकात देण्यात आले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या