Thursday, September 3, 2026
Homeदेश विदेशकाँग्रेसचे माजी खासदार, १९८४ शीखविरोधी दंगलीतील दोषी सज्जन कुमार यांचा कारावासात मृत्यू

काँग्रेसचे माजी खासदार, १९८४ शीखविरोधी दंगलीतील दोषी सज्जन कुमार यांचा कारावासात मृत्यू

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
१९८४ मधील शीखविरोधी दंगली प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे गुरुवारी, २० ऑगस्ट २०२६ रोजी मृत्यू झाला. ते ८० वर्षांचे होते. प्रकृती खालावल्याने त्यांना तिहार तुरुंगातून दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

- Advertisement -

१९८४ च्या दंगली प्रकरणात जन्मठेप
सज्जन कुमार यांच्याविरोधात १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये उसळलेल्या शीखविरोधी हिंसाचाराशी संबंधित अनेक खटले चालले. या हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर शीख समाजातील नागरिकांचा मृत्यू झाला होता.

दिल्ली उच्च न्यायालयाने डिसेंबर २०१८ मध्ये राज नगर परिसरातील प्रकरणात कुमार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात एका कुटुंबातील पाच जणांच्या हत्येसह गुरुद्वाराला आग लावल्याचा आरोप होता. या निकालानंतर सज्जन कुमार यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून हा निर्णय कळवला होता.

RSS वर निर्बंध लावा! मोहन भागवतांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी USCIRF आक्रमक

२०२५ मध्ये आणखी एका प्रकरणात जन्मठेप
सज्जन कुमार यांना १२ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीतील विशेष न्यायालयाने १९८४ च्या दंगलीतील आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले. या प्रकरणात जसवंत सिंह आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंह यांच्या हत्येशी संबंधित आरोप होते. न्यायालयाने त्यांना खून, दंगल आणि इतर संबंधित गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या प्रकरणातील न्यायालयीन नोंदीनुसार, १ नोव्हेंबर १९८४ रोजी राज नगर परिसरात जमावाने जसवंत सिंह आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंह यांच्यावर हल्ला करून त्यांना जिवंत जाळल्याचा आरोप होता. या प्रकरणात सज्जन कुमार यांच्यावर जमावाला चिथावणी देणे आणि त्याचे नेतृत्व केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

ताज्या बातम्या