Sunday, July 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविभागात ८९२ बोगस कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे; शालार्थ रॅकेटचा पर्दाफाश, गुन्हे दाखल करण्याचे...

विभागात ८९२ बोगस कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे; शालार्थ रॅकेटचा पर्दाफाश, गुन्हे दाखल करण्याचे आदेश

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक विभागातील खासगी शाळांमध्ये बनावट शालार्थ आयडीद्वारे शासकीय तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या ८९२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोठे रॅकेट उघड झाले आहे. गेल्या पाच वर्षांत (२०२०-२०२५) बनावट कागदपत्रे आणि जावक क्रमांकांचा वापर करून या कर्मचाऱ्यांनी कोट्यवधींचे वेतन लाटल्याचे शिक्षण उपसंचालकांच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

‘डिजिटल’ पोलिसांचा ‘मॅन्युअल’ कारभार ! फिर्यादींच्या नशिबी कोर्टकचेरीच्या फेऱ्या; जप्त मुद्देमाल मिळविताना दमछाक

- Advertisement -

या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या कोणत्याही फाईल्स कार्यालयात उपलब्ध नसल्याने हा प्रकार नियोजनबद्ध आर्थिक घोटाळा असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची दखल घेत राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी संबंधित ८९२ कर्मचारी, शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि संगनमत करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व संशयास्पद कर्मचाऱ्यांचे पगार तातडीने रोखण्यात आले असून, जळगावमधील जुन्या गुन्ह्याशी या प्रकरणाचे धागेदोरे जोडले जात आहेत.

ताज्या बातम्या

राज-का-रण : ‘जेन झी’चा एल्गार, आम्हाला गृहीत धरू नका…

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक या आंदोलनाचे तात्कालीक कारण दिल्लीतील लाठीमार असले, तरी त्यामागे खदखदणारा असंतोष अनेक वर्षांचा आहे. ही पिढी...