Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअभिजित दिपके आणि मोदी यांच्यात अमेरिकेत भेट झाल्याचा संजय राऊतांचा दावा; म्हणाले…

अभिजित दिपके आणि मोदी यांच्यात अमेरिकेत भेट झाल्याचा संजय राऊतांचा दावा; म्हणाले…

मुंबई | Mumbai
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा करत राजकीय वातावरण तापवले आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत गुप्त भेट झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. एवढंच नाही, तर या भेटीचा फोटो आपल्याकडे असल्याचंही त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, “अभिजीत दीपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत बैठक झाली. त्या बैठकीचे फोटो मला एका व्यक्तीने पाठवले आहेत. या भेटीनंतरच दीपके भारतात परतले,” असा दावा त्यांनी केला. मात्र, हे आरोप मी करत नसून लोकांकडून मिळालेली माहिती मांडत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि भाजप यांच्यात काही संबंध आहेत का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, शिक्षणव्यवस्था आणि NEET परीक्षेच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या अभिजीत दीपकेंच्या संघटनेला विरोधी पक्षांकडून काही प्रमाणात समर्थन मिळालं होतं. या पार्श्वभूमीवर राऊतांच्या दाव्याने राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Petrol Exicse Duty: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्क रद्द

दरम्यान, संजय राऊतांच्या या दाव्यावर अद्याप पंतप्रधान कार्यालय, भाजप किंवा अभिजीत दीपके यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे या दाव्याबाबत राजकीय स्तरावर चर्चा रंगली असली, तरी त्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
अभिजीत दीपके हे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक असून त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी, परीक्षा पद्धती आणि NEET प्रकरणावरून आंदोलन छेडलं आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी मोदी-दीपके भेटीचा दावा करत राजकीय खळबळ उडवली आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...