धुळे | Dhule
राजस्थानमधील कोटा येथे धुळे जिल्ह्यातील (Dhule District) प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलरला मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून, ६ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये धुळे शहरातील शांतिगीत नगर, नवनाथ नगर आणि शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील रहिवाशांचा समावेश आहे. वाहनात एकूण १५ प्रवासी होते.
हे देखील वाचा : Dhule Family Accident News : खाटूश्यामजीचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; धुळ्यातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा जागीच मृत्यू
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त (Accident) वाहनाचा क्रमांक एमएच- १८ सीएल ३००५ असून, मृतांचे मृतदेह कोटा येथील न्यू मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहेत. जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये उषाबाई सज्जन पवार (६०), सुशिलाबाई बाबूलाल पवार (६५), कैलास भगवान पवार (४५), सान्वी गणेश पवार (६), सज्जन दौलत पवार (७०), अनिता कैलास पवार (४०), बाबूलाल दौलत पवार (७३), जानवी कैलास पवार (१३) आणि माधवी गणेश पवार (४५) यांचा समावेश आहे.
तर जखमींमध्ये (Injured) मनीषा शरद पवार (४१), मयुरी शरद पवार (२०), जगदीश कैलास पवार (१०), श्रीजीत गणेश पवार (४), शरद बाबूलाल पवार (४५) आणि गणेश सज्जन पवार (३२) यांचा समावेश आहे. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाने कोटा (Kota) पोलीस नियंत्रण कक्षाकडून ही माहिती दिली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.




