Saturday, April 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray: "पाणी कुठपर्यंत मुरलय ते कळू द्या"; अशोक खरात प्रकरणावर उध्दव...

Uddhav Thackeray: “पाणी कुठपर्यंत मुरलय ते कळू द्या”; अशोक खरात प्रकरणावर उध्दव ठाकरेंची भुमिका, म्हणाले कुठल्याही पक्षाचा झेंडा…

मुंबई | Mumbai
नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची अनेक प्रकरणं आता समोर येऊ लागली आहेत. अशोक खरात याच्यासाठी छत्री पकडल्याचा आणि पाय धुतल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. अशोक खरात यांचे अनेक राजकीय व्यक्तींशी चांगले संबंध होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भोंदूबाबांसोबत राजकारणातील भोंदू भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे, असे स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले आहे.

भोंदू भक्तांवर कारवाई झाली पाहिजे
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (ता. २१ मार्च) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केले. यावेळी त्यांनी म्हटले की, आणखी किती खालच्या पातळीवर महाराष्ट्र नेणार आहोत. महाराष्ट्रात जादू टोणाविरोधी कायदा आहे. कायद्याचे पालन करणारेच भोंदू बाबाच्या नादी लागणार असतील तर त्यांच्या भोंदू भक्तांवर कारवाई झाली पाहिजे.

- Advertisement -

Sunetra Pawar : रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या?

टाचण्या, लिंबाचा विषय समोर आलाय
आम्ही महाराष्ट्रला पुढे नेणार आहोत, हा विषय घेऊन पुढे जातोय. पण, टाचण्या, लिंबाचा विषय समोर आलाय हे योग्य नाही. एपस्टीन फाईलमधून कोणाचे लक्ष उडू नये यासाठी सगळ्या गोष्टी सुरू आहेत. अनेक फोटो आणि नावे समोर येत आहेत, ज्यांचे कर्तृत्व नाही त्यांना असे मार्ग घ्यावे लागतात, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

कर्तृत्व शून्य नेते हा मार्ग अवलंबत आहे
अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आणि नावे येतात. याचा अर्थ तुम्हाला कळतोय ना. कर्तृत्व शून्य नेते हा मार्ग अवलंबत आहेत. भाकड आणि भोंदू नेते त्यांच्यात कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने काही करू शकत नाही तेच लोक अशा भोंदूबाबांच्या नादी लागले आहे, असे टीकास्त्र ठाकरेंनी डागले.

पाणी कुठपर्यंत मुरलेय ते कळू द्या
महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही या भोंदूबाबाला मदत झाली यासंदर्भातही उद्वव ठाकरेंनी भाष्य केले. माझे काहीही म्हणणे नाही, तुम्ही सगळ्यांची चौकशी करा. कारण, पाणी कुठपर्यंत मुरलेय ते कळू द्या, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात भोंदू बाबाला पाणी देण्यासाठी केलेल्या मदतीवरूनही स्पष्टीकरण दिले. तसेच, यानिमित्ताने गावोगावी असलेल्या भोंदूबाबांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्याकडे कुठल्याही पक्षाचा झेंडा असला तरी कारवाई झाली पाहिजे, अगदी ओम फट स्वाहा.. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

विरोधकांनी महिलांचा अधिकार हिसकावला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
दिल्ली | देशातील महिला शक्तीचे उडान विरोधकांकडून थांबविण्यात आले असून आमचे अथक प्रयत्न करून सुद्धा महिला आरक्षणात बदल होऊ शकला नाही. विरोधकांनी महिलांचा अधिकार...