Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूज“ब्लॅक बॉक्स सुरक्षित!” — AAIB, DGCA च्या अहवालाबाबत अजित दादांच्या निकटवर्तीयांची मोठी...

“ब्लॅक बॉक्स सुरक्षित!” — AAIB, DGCA च्या अहवालाबाबत अजित दादांच्या निकटवर्तीयांची मोठी माहिती

बारामती | Baramati
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. यामध्ये त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी विमान कंपनी VSR आणि DGCA यांच्यावर गुन्हा दाखव व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी ते काल मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान त्यांचा अर्ज गुन्हे शाखेकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. तर आज अजितदादांचे दोन्ही पुतणे रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी बारामती पोलीस ठाण्यात धाव घेत व्हीएसआर विमान कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नेत्यांनी बारामती येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

बारामती येथील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत किरण गुजर यांनी पक्षाची भूमिका मांडली. यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव आणि तालुकाध्यक्ष संदीप बांदल उपस्थित होते. यावेळी गुजर म्हणाले, कालच डीजीसीए आणि एएआयबी यांनी ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अहवाल दिला आहे.

- Advertisement -

माजी नगरसेवक किरण गुजर म्हणाले की, कालच डीजीसीए आणि एएआयबी यांनी ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अहवाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ अजित पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्या संदर्भात कार्यवाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केली आहे.

Sanjay Raut: “अजित पवारांचा मृत्यू अपघात नाही, सदोष मनुष्यवध!” —संजय राऊतांचा गंभीर आरोप

11 फेब्रुवारी रोजी जय अजित पवार यांनी देखील अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावर कालच अहवाल येऊन कार्यवाही सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) वतीने किरण गुजर यांनी मागणी केली की, या तपासाला गती मिळावी, सीबीआय चौकशीही गतिमान व्हावी आणि ज्यांच्या विरोधात अहवाल येईल, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा.

अजितदादांचा ज्या विमान अपघातात मृत्यू झाला, त्याचा ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यावरुन शरद पवार गटाकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तसेच सीआयडीच्या तपासाला विलंब का होत आहे, असाही सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यावर कोणत्याही अहवालाला विलंब होतो, हे आपल्या हातात नसून, यासाठी स्वतंत्र यंत्रणा असून तपास करताना तांत्रिक बाजू देखील तपासावी लागते, असे किरण गुजर म्हणाले. ब्लॅक बॉक्सबाबत संबंधीच्या बातम्या खऱ्या आहेत की खोट्या, हे आपल्याला माहिती नव्हते; परंतु कालच अहवाल आला आहे की ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. आलेला अहवाल ग्राह्य धरायला हवा, असेही ते म्हणाले.

बारामती माझा श्वास आहे, तो कधीच थांबणार नाही…; बारामती पोलिस स्टेशनबाहेर समर्थकांची मोठी गर्दी

आमदार रोहित पवार यांच्याप्रमाणंच आपल्या पक्षाचीही तशीच मागणी असून, सुनेत्रा पवारही या मागणीवर ठाम असल्यानं त्या संदर्भातली कार्यवाही मुख्यमंत्री फडणवीस करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करत तपासात विसंगती न होता गती मिळावी विसंगती होऊ नये संभ्रम निर्माण होऊ नये हीच आमची मागणी असल्याचा पुनरुच्चार केला.

ताज्या बातम्या

BRICS

BRICKS Summit 2026: BRICSचा महासंगम! मोदी, पुतीन, शी जिनपिंग एकाच मंचावर...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताच्या अध्यक्षतेखाली १८वी BRICS शिखर परिषद (18th BRICKS Summit 2026) १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत...