Monday, August 31, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकाढ रे तो फोटो...; छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो शेजारी मोदींचा फोटो कशाला?...

काढ रे तो फोटो…; छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो शेजारी मोदींचा फोटो कशाला? अमित ठाकरेंचा मुख्यध्यापकांना सवाल

पुणे | Pune
पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) अध्यक्ष अमित ठाकरे यांचा दौरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्यांनी कॉलेजमधील वसतीगृह अधीक्षकांच्या कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी असलेल्या पंतप्रधान मोदींचा फोटो हटवायला लावला. फोटो हटवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

शासकीय कार्यालयांमध्ये महापुरुषांचे फोटो लावण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे व केंद्र शासनाचे सुस्पष्ट नियम आहेत. असे असताना वसतिगृह अधीक्षकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी पंतप्रधान मोदी यांचा फोटो कसा काय? असा सवाल विचारीत अमित ठाकरे यांनी आक्षेप नोंदवला.

अमित ठाकरे यांनी तंत्रनिकेतन महाविद्यालयाची पाहणी केली, यावेळी या कॉलेजमध्ये गेल्यावर अमित ठाकरे यांनी कँटिनमध्ये मिळणारे जेवण आणि खेळाडूंना प्रशिक्षक मिळत नसण्यावरून कॉलेजच्या अधीक्षक, मुख्याध्यापकांना जाब विचारला. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या शेजारी नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) फोटो लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला, असे मुख्याधापकांना विचारले. ‘काढ रे तो फोटो….’, असे आदेश त्यांनी कार्यकर्त्याला दिले. कार्यकर्त्याने देखील पुढच्या मिनिटभरात शिवाजी महाराजांशेजारी असलेला पंतप्रधान मोदींचा फोटो काढला.

दिल्लीत पुन्हा निर्भयासारखी घटना! ४७ किमी धावत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, चालक-वाहक अटकेत

पुणे दौऱ्यावर असलेले अमित ठाकरे हे पुण्यातील सात कॉलेजला भेट देणार आहेत. तसेच कॉलेजमधील जेन-झी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. ते पुण्यात शैक्षणिक भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडणार आहेत. त्याचबरोबर कॉलेजबाहेर सिगारेट, गुटखा विक्रीविरोधातही कारवाईची मागणी करणार आहेत.

ताज्या बातम्या