Tuesday, September 1, 2026
Homeक्राईमदिल्लीत पुन्हा निर्भयासारखी घटना! ४७ किमी धावत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, चालक-वाहक...

दिल्लीत पुन्हा निर्भयासारखी घटना! ४७ किमी धावत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, चालक-वाहक अटकेत

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राजधानी दिल्लीला पुन्हा एकदा हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील १६ वर्षीय विद्यार्थिनीसोबत स्लीपर बसमध्ये कथित सामूहिक लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. ही घटना ४ ऑगस्टच्या रात्री घडली. विशेष म्हणजे, विद्यार्थिनीला घेऊन जाणारी बस तब्बल ४७ किलोमीटरचा प्रवास करत दिल्लीतील काश्मिरी गेट परिसरात पोहोचली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी बसचालक आणि वाहकाला अटक केली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही मूळची उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती सध्या ११ वीमध्ये शिकत आहे. अभ्यासावरून आई रागावल्याने तिने रागाच्या भरात घर सोडण्याचे ठरवले. तिने ४ ऑगस्ट रोजी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. नोएडा सेक्टर-६३ येथे राहणाऱ्या आपल्या चुलत भावाकडे जाण्यासाठी ती बसमध्ये बसली. मात्र, नोएडामध्ये मुसळधार पाऊस आणि अंधार असल्यामुळे ती चुकीने परी चौक येथे उतरली.

चालक, वाहकाचा लैंगिक अत्याचार
याचवेळी तेथून एक रिकामी स्लीपर बस जात होती. विद्यार्थिनीने बस थांबवण्यासाठी हात दाखवला. चालकाने बस थांबवली. चालक आणि वाहकाने आपण नोएडा सेक्टर-६३च्या दिशेने जात असल्याचे सांगून तिला बसमध्ये घेतले. बस काही अंतर पुढे गेल्यानंतर वाहकाने तिच्याशी अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चालक आणि वाहकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तिच्या जबाबात नमूद आहे.

४७ किलोमीटरचा प्रवास
या घटनेतील आणखी धक्कादायक बाब म्हणजे बसच्या स्लीपर बर्थना पडदे लावलेले होते. त्यामुळे बसच्या बाहेरून आतमध्ये काय सुरू आहे, हे दिसत नव्हते. याचाच फायदा आरोपींनी घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या तपासानुसार, बसने ग्रेटर नोएडातील परी चौक ते दिल्लीतील काश्मिरी गेटपर्यंत सुमारे ४७ किलोमीटरचा प्रवास केला. या संपूर्ण प्रवासादरम्यान बस सुरू होती. अखेर आरोपींनी विद्यार्थिनीला काश्मिरी गेट ISBTजवळील रिंग रोड परिसरात सोडून दिले आणि तेथून निघून गेले.

घटनेनंतर घाबरलेल्या विद्यार्थिनीने धाडस दाखवत काश्मिरी गेट पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही आणि इतर तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. अखेर बसचालक कुलदीप आणि वाहक संदीप यांना उत्तर दिल्लीतील तिमारपूर परिसरातील बस पार्किंगमधून अटक करण्यात आली.

Nashik News : समृद्धीवर ९६ किमीच्या पट्ट्यात पेट्रोलिंग; लुटीच्या घटनांनंतर ग्रामीण पाेलिसांची विशेष उपाययाेजना

पोलिसांनी कथित गुन्ह्यात वापरलेली स्लीपर बस ताब्यात घेतली असून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

तपासात आणखी एक माहिती समोर आली आहे. या बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती ग्रेटर नोएडातील सुरजपूर येथील वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी नेण्यात आली होती. दुरुस्ती झाल्यानंतर चालक आणि वाहक बस रिकामी घेऊन तिमारपूरच्या दिशेने जात असताना परी चौक परिसरात विद्यार्थिनी त्यांच्या संपर्कात आली.

ताज्या बातम्या

एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; भाविकांच्या पिकअपची ट्रकला धडक, ६ जणांचा मृत्यू, १४...

0
दिल्ली । Delhi धार्मिक यात्रेचा आनंद क्षणात दुःखात बदलल्याची हृदयद्रावक घटना हरियाणातील कुंडली-मानेसर-पालवल (KMP) एक्सप्रेसवेवर घडली. राजस्थानमधील खाटू श्याम आणि सालासर बालाजी मंदिरांचे दर्शन घेऊन...