मंदिराच्या गोशाळेला भेट, गोमाता, हत्तींसोबत घालवला वेळ
तिरुमला
रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी रविवारी पहाटे तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर यांच्या पवित्र मंदिरात दर्शन घेत श्रद्धाभावनेने पूजा-अर्चा केली. अनंत अंबानी पहाटे १ वाजता तिरुमला येथे पोहोचले. यावेळी त्यांनी भगवान व्यंकटेश्वर स्वामींना केशदान करुन शतकानुशतके चालत आलेली परंपरा पाळली. तिरुमला येथे येणारे लाखो भाविक, भक्ती आणि समर्पणाचे प्रतिक म्हणून ही प्रथा आजही पाळतात.
त्यांच्या या भेटीतून आधुनिका काळातही श्रद्धा आणि संस्कृती आणि आपल्या परंपरांशी असलेले नाते कायम असल्याचा संदेश अधोरेखित झाला. त्यानंतर पहाटे सुमारे ३.३० वाजता त्यांनी मंदिरातील सुप्रभात सेवा या विशेष धार्मिक विधीत सहभाग घेतला. भगवान व्यंकटेश्वरांच्या जागरणाचा हा पारंपारिक सोहळा अत्यंत पवित्र मानला जातो. दर्शनानंतर मंदिरातील वेदपंडितांनी त्यांना वैदिक आशिर्वाद दिले.
तसेच तिरुमला तिरुपती देवस्थानम चे कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचा सन्मान करुन स्मृतिचिन्ह आणि प्रसाद प्रदान केला.
Maharashtra monsoon update : राज्यभरात धो धो पाऊस कोसळणार; ‘या’ ठिकाणी येलो अलर्ट जारी
अनंत अंबानी यांच्या या अध्यात्मिक भेटीतून भारताच्या समृद्ध, धार्मिक परंपरा, संस्कृती आणि अध्यात्मविषयीची त्यांची निष्ठा पून्हा एकदा अधोरेखित झाली आहे. देशातील प्रमुख तिर्थक्षेत्रापैकी एक असलेल्या तिरुमलामध्ये पहाटेच्या या पहाटेच्या धार्मिक विधीचे दर्शन हजारो भाविकांनी घेतले.
अनंत अंबानी यांनी मंदिरातील हत्तींचे घेतले दर्शन
यावेळी अनंत अंबानी यांनी मंदिराच्या गोशाळेलाही भेट दिली. तेथे त्यांनी गोमातेचे तसेच मंदिरातील हत्तींचे दर्शन घेत त्यांच्याशी संवाद साधला. यानंतर त्यांनी तिरुपती येथील श्री पद्मावती अम्मावारी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सकाळी सुमारे ६.३० वाजता त्यांनी तिरुपतीहून प्रस्थान केले.




