Tuesday, March 31, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case : खरातच्या मंदिरासाठी २०१८ साली सरकारकडून निधीची 'खैरात'; सभामंडप,...

Ashok Kharat Case : खरातच्या मंदिरासाठी २०१८ साली सरकारकडून निधीची ‘खैरात’; सभामंडप, भक्तनिवास बांधकाम, चेंजिंग रूमचा समावेश

मुंबई | Mumbai

महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातला (Ashok Kharat) नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने (Nashik Court) पुन्हा एकदा पाच दिवसांची म्हणजे (दि.२९ मार्चपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. काल (मंगळवारी) न्यायालयात या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीसह पोलिसांनी खरातकडे २१ जिवंत काडतुसे सापडली असून, त्यापैकी पाच काडतुसांचा वापर झाल्याचे म्हणत त्याने पाच जणांचा खून केला की अघोरी पूजेसाठी नरबळी दिला? असा खळबळजनक संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आता २०१८ साली ज्यावेळी शिवसेना-भाजपचे सरकार होते तेव्हा खरातच्या मंदिरासाठी सरकारने निधी दिल्याची कागदपत्रे समोर आली आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ साली भाजप-शिवसेनेच्या महायुती सरकारने (Mahayuti Government) अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटींचा निधी मंजूर केला होता. त्या निधी संदर्भातील २०१८ चा शासन आदेश असून, तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून १०५ कोटींचा रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. ३१ मार्च २०१८ रोजी ईशान्येश्वर मंदिरासाठी हा जीआर काढण्यात आला होता.१०५ कोटींमधून २५ लाख रुपये तत्काळ मंजूर करण्यात आले होते. यामध्ये सभामंडप बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसवणे, महिला व पुरुष प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, भक्तनिवास बांधकाम, विद्युतीकरण व लैंडस्केपिंग यांचा समावेश होता. ही माहिती समोर आल्याने आता या विषयावरुन नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, खरातचे आर्थिक व्यवहार संभाळणारा सीए पुण्यातील असल्याची माहिती समोर आली असून, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आपल्या निवेदनात त्याचा उल्लेख केला होता. ⁠ललित पोफळे असे अर्थिक व्यवहार बघणाऱ्या सीएचे नाव असून, तो खरातच्या ट्रस्टवर पाच वर्षे संचालक होता. या दोघांनी एकमेकांच्या खात्यावर पैशांची देवाणघेवाण केल्याचे बोलले जात आहे. त्याने खरातच्या पैशातून पुणे, नोयडा, दिल्ली आणि मुंबईमध्ये अनेक संपत्ती घेतल्याचे बोलले जाते. खरात हा पोफळेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या काळ्या पैशांची गुंतवणूक करत होता, असे समजते.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : खरातच्या अघोरी कृत्यांनी नाशिक हादरले; SIT तपासात अंगावर शहारे आणणारी माहिती समोर

ज्यात झाला नापास त्यातच बनवलं करिअर

अंकशास्त्राचा आधार घेऊन लोकांचे भविष्य सांगणारा भोंदू अशोक खरात हा स्वतः दहावीच्या परीक्षेत गणितात नापास असल्याचे समोर आले आहे. ज्या अंकांच्या जोरावर तो भक्तांना भुलवत होता, त्याच विषयात त्याला केवळ २८ गुण मिळाले होते. खरातचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) असून त्याने वावी येथील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. त्याला दहावीच्या परीक्षेत ३५.८६ टक्के गुण मिळाले होते. सहापैकी दोन विषयांत तो अनुत्तीर्ण झाला होता. त्याला गणितात २८ (नापास), इंग्रजीत ३७, मराठीत ३९, विज्ञानात ६२, समाजशास्त्रात ३८ आणि हिंदीत ४७ गुण मिळाले होते. तो दहावीत ७०० पैकी २५१ गुण मिळवण्यात यशस्वी झाला होता.पंरतु, ज्या विषयात तो नापास झाला पुढे त्याच विषयात त्याने आपले करिअर बनवत अनेकांची लूट करत कोट्यवधींची संपत्ती कमवली.

ताज्या बातम्या

संपादकीय : ३१ मार्च २०२६ – राजेशाही नको; अन् विदूषकही!

0
आपल्याच देशबांधवांना स्टुपिड म्हणजे मूर्ख म्हणणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या संपूर्ण जगाला वेठीस धरणारे जे उद्योग चालवले आहेत, ते पाहता ते स्वत:च...