Sunday, October 18, 2026
Homeक्राईमNashik News: वडील पोहत होते, मुलानेही पाण्यात उडी घेतली; काही क्षणांतच घडलं...

Nashik News: वडील पोहत होते, मुलानेही पाण्यात उडी घेतली; काही क्षणांतच घडलं भयंकर, वाचून अंगावर काटा येईल!

नवीन नाशिक | प्रतिनिधी
पाण्यात पोहत असलेल्या वडिलांना पाहून पाण्यात उतरलेल्या १४ वर्षीय मुलाचा डोहातील पाण्याच्या प्रवाहात बुडण्याचा प्रकार लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या वडिलांचाही बुडून मृत्यू झाला. मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असून, त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.२४) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पहिने बारी ते वाडीवऱ्हे रस्त्यालगत असलेल्या डोहात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय धोंडू सोनवणे (वय ४८, रा.अक्षय चौक, नवीन नाशिक ) असे मृत वडिलांचे नाव आहे. त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्री सोनवणे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. संजय सोनवणे हे डोहातील पाण्यात पोहत होते. त्यांना पाहून त्यांच्या मुलालाही पाण्यात उतरण्याचा मोह झाला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने काही वेळातच तो पाण्यात बुडू लागला. मुलगा बुडत असल्याचे दुरवरुन लक्षात येताच संजय सोनवणे यांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, डोहातील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात ते स्वतःच पाण्यात बुडाले.

- Advertisement -

पुढच्या वर्षी लवकर या! लाडक्या बाप्पाला निरोप; नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरवात

घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलिसांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहीम राबवत रात्री साडेसातच्या सुमारास संजय सोनवणे यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी वाडीवऱ्हे पोलिस आणि बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...