Thursday, April 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSupriya Sule: बारामती पोटनिवडणुक प्रचार सांगता सभेला जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या,...

Supriya Sule: बारामती पोटनिवडणुक प्रचार सांगता सभेला जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, अर्थातच वहिनींसाठी…

मुंबई | Mumbai
बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांनी बारामती तालुका पिंजून काढल्यानंतर मंगळवारी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीची सांगता सभा पार पडणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या सांगता सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळे हेही उपस्थित राहणार आहेत. या सभेला शरद पवार उपस्थित राहणार की नाही याबाबत सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
मला काल सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता
मला काल सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता की, कुटूंब म्हणून प्रचाराला या. कारण आम्ही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आणि आम्ही सर्वांनी पहिल्यांदाच निर्णय घेतला होता. सुनेत्रा वहिनींची निवड बिनविरोध व्हावी. ही पहिली भूमिका आम्ही मांडली होती. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष, उद्धव ठाकरेंचेही मी आभार मानते. त्या सर्वांनीच सहकार्याची भूमिका घेतली आणि आज महाविकास आघाडीच्या वतीने कारण का मला काल आमंत्रणाचा फोन आला की नक्की या.

Khashaba Jadhav: ७४ वर्षाची प्रतिक्षा संपणार, ऑलिम्पिक पदक विजेते पैलवान खाशाबा जाधव यांना मिळणार मरणोत्तर पद्मविभूषण

कुटूंब म्हणून जाणार असाल तर जा
तर कुटूंब म्हणून मी अर्थातच वहिनींसाठी हजर आहेच पण त्याचबरोबर माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत. आमचे मित्र पक्ष आहेत.” त्यामुळे काही नैतिक जबाबदारी म्हणून मी काल काँग्रेसशी बोलले आणि उद्धव ठाकरेंशीही बोलले, दोघांचीही सहकार्याची भावना इतकीच होती की, कुटूंब म्हणून तुम्ही जाणार असाल तर जा आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनेही शुभेच्छा, आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला, महाविकास आघाडीतील पक्षांनी सुनेत्रा वहिनींना पाठिंबा दिला आहे. आम्हाला सर्वांना वाटलं होतं की, निवडणूक बिनविरोध होईल, मतदानाची वेळ येईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं, असंही पुढे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

शरद पवार सभेला जाणार का?
शरद पवार सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला येणार का? या पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पवार साहेब ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आत्ता आहेत, त्यांच्या काही टेस्ट चालल्या आहेत, त्यामुळे त्याच्यानंतर काय ते समजेल, असेही सुळेंनी पुढे म्हटले आहे.

आज ही अंगावर काटा येतो
माझा भाऊ गेला आहे, पोटनिवडणूक होईल असे वाटत नाही, आज ही अंगावर काटा येतो,अनेक वेळा असे वाटते की दादा गेला का? खरंच दादा गेला की नाही अशी भावना निर्माण होते. विमान पडले कसे? दादा खरंच गेले? असे प्रश्न मनात निर्माण होते आहेत, आमच्या नात्यात कधीही अंतर आलेले नाही, काल, आज आणि उद्या, वैयक्तिक संबंध राजकारणात कधीच येऊ दिले नाहीत. मला आज दुःख होते आहे, मी जड अंतःकरणाने मी बारामतीला जाते आहे, माझा भाऊ गेला आहे. मला खेड शिवापुरला सायंकाळी लग्नाला जायचंं आहे, ३ ते ४ वाजता आम्ही बारामतीच्या सभेला असू, सीएम कधी येणार माहिती नाही, असंही पुढे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल

Petrol-Diesel Price Hike: पाच राज्यातील निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती २५ ते २८...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiदेशात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. राजकीय सभा आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण तापले असतानाच, सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी एक...