Monday, June 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजINDvsAFG Series: अफगाणिस्तान विरुद्ध मालिकेसाठी भारतीय कसोटीस, एकदिवसीय संघाची घोषणा; नव्या चेहऱ्यांना...

INDvsAFG Series: अफगाणिस्तान विरुद्ध मालिकेसाठी भारतीय कसोटीस, एकदिवसीय संघाची घोषणा; नव्या चेहऱ्यांना संधी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतात सध्या आयपीएलची धूम सुरू आहे. आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर लगेचच भारतीय संघ जूनमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारताचा आक्रमक फलंदाज शुभमन गिल याच्याकडे वन-डे सह कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. तर वन-डे साठी श्रेयस अय्यरकडे उपकर्णधार पद तर के एल राहुलकडे कसोटीचे उपकर्णधारपद सोपावण्यात आले आहे. यासह या मालिकेमध्ये नव्या खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे २०१८ नंतर म्हणजेच आठ वर्षांनी भारताविरुद्ध अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना असेल. २०१८ मध्येच अफगाणिस्तानने बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पहिल्यांदाच अधिकृतरित्या कसोटी सामन्यात भाग घेतला होता. भारताने तो सामना एक डाव आणि २६२ धावांनी जिंकला होता.

जसप्रीत बुमराहला विश्रांती
भारताचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह याला अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्याआधी त्याचा वर्कलोड मॅनेज करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. तर कसोटी आणि वनडे मालिकेसाठी दोन नव्या चेहऱ्यांना संघात संधी दिली आहे. तर दोन्ही संघांमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे.

असे असेल सामन्याचे वेळापत्रक
६ जून रोजी पहिला कसोटी सामना न्यू चंदीगड येथे सकाळी साडेनऊ वाजता होईल.
पहिला वनडे सामना १४ जून रोजी धर्मशाला येथे दुपारी दीड वाजता सुरू होईल.
१७ जून रोजी दुसरा वनडे सामना होईल. लखनऊच्या मैदानावर दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
२० जून रोजी तिसरा सामना चेन्नई येथे खेळवण्यात येणार आहे. हा सामना देखील दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे.

Rahul Gandhi: मोदी नागरिकांना परदेश दौरे टाळण्याचा सल्ला देतात, पण…; राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

असा असणार आहे एकदिवसीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव. गुरनूर ब्रार, हर्ष दुबे

कसोटीसाठी असा असेल संघ
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल,नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...