Thursday, June 18, 2026
Homeदेश विदेशNalanda Stampede: बिहारच्या नालंदामधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; ८ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक...

Nalanda Stampede: बिहारच्या नालंदामधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; ८ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक जण जखमी

पाटणा | Patna
बिहारच्या नालंदा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. मगडा शीतला मंदिरात मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध शीतला माता मंदिर परिसरात अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले. चैत्र महिन्यातील शेवटचा मंगळवार असल्याने दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी झालेली प्रचंड गर्दी आणि नियोजनाच्या अभावामुळे एकच गर्दी उसळली ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. घटनेनंतर तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले.

- Advertisement -

Narhari Zirwal: मंत्री नरहरी झिरवाळ व्हायरल व्हिडीओ प्रकरण; पवन यादवची भावाविरोधात ब्लॅकमेलची तक्रार, नेमकं काय झाल?

मघडा येथील शीतला मंदिरात दर मंगळवारी दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने मंदिरात अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती. या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली पाहायला मिळाली. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती आणि त्याच दरम्यान सकाळच्या सुमारास काही कारणास्तव चेंगराचेंगरी झाली. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत १० ते १२ जण जखमी झाल्याचे समजत आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी बिहार शरीफमधील मॉडेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मंदिराचा परिसर संपूर्ण रिकामा करण्यात आला असून घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : ‘बनावट मतपत्रिका’ व्हायरल झाली अन् गिते...

0
नाशिक | Nashik नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नऊ मतदान केंद्रांवर (Voting Center) जाऊन मतदानाचा...