Wednesday, September 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजऐनवेळी विमानाचा मार्ग बदलला; शिंदेंचे ६ अधिकारी झ्युरिकमध्ये अडकले, नेमकं काय झालं?

ऐनवेळी विमानाचा मार्ग बदलला; शिंदेंचे ६ अधिकारी झ्युरिकमध्ये अडकले, नेमकं काय झालं?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यादरम्यान ऐनवेळी विमानाचा मार्ग बदलण्यात आल्याने त्यांच्या कार्यालयातील सहा अधिकारी स्वित्झर्लंडमधील झ्युरिक येथे अडकले आहेत. लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील विमान वाहतुकीवर ब्रिटनच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय लंडन दौऱ्यावर आहेत. ब्रिटिश संसदेत ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सन्मान होणार आहे. या दौऱ्यासाठी त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, ओएसडी आणि अधिकृत छायाचित्रकारांसह सहा जण लंडनला रवाना झाले होते. मात्र, त्यांचे विमान हिथ्रो विमानतळावर उतरण्याऐवजी स्वित्झर्लंडमधील झ्युरिक विमानतळाकडे वळवण्यात आले.

- Advertisement -

विमान लंडनच्या दिशेने जात असताना हिथ्रो विमानतळावरील विमान वाहतूक व्यवस्थेत मोठा तांत्रिक अडथळा निर्माण झाला.

ब्रिटनच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये मोठा बिघाड
या घटनेमागे ब्रिटनच्या NATS (National Air Traffic Services) या एअर ट्रॅफिक कंट्रोल संस्थेच्या फ्लाइट-डेटा प्रोसेसिंग यंत्रणेतील तांत्रिक बिघाड असल्याचे समोर आले आहे. या बिघाडामुळे हिथ्रोसह ब्रिटनमधील अनेक प्रमुख विमानतळांवरील हवाई वाहतूक विस्कळीत झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी (OSD) आणि फोटोग्राफर यांच्यासह एकूण ६ अधिकाऱ्यांच्या विमानाचे लँडिंग हिथ्रो विमानतळावर होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांचे विमान तातडीने स्वित्झर्लंडमधील झ्युरिक (Zurich) येथे डायव्हर्ट करण्यात आले. परिणामी उपमुख्यमंत्र्यांचे सर्व सहा अधिकारी सध्या झ्युरिकमध्येच अडकून पडले आहेत.

राज्य सरकारला मनोज जरांगेंना मारायचंय…संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, सत्ताधाऱ्यांच्या गळ्यातील फास…

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या तांत्रिक समस्येमुळे मंगळवारी ब्रिटनमधील १,००० हून अधिक उड्डाणे रद्द झाली, तर अनेक उड्डाणांना विलंब झाला. हिथ्रो, गॅटविक, लंडन सिटी, ल्यूटन यांसह अनेक विमानतळांवर प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

उपमुख्यमंत्री कार्यालयातील सहा अधिकारी झ्युरिक येथे अडकल्यानंतर त्यांना पुढे लंडनला पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू झाले. उपलब्ध माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेपाचच्या सुमारास हे विमान झ्युरिकला पोहोचले आणि त्यानंतर या अधिकाऱांना लंडनला आणण्यासाठी सकाळी सातच्या सुमारास पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सन्मान
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यात ब्रिटिश संसदेत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ९ सप्टेंबर रोजी हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये त्यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमासाठी यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि कॅनव्हास फॉर केअर यांच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

गावागावांत आता ‘अधिकारी’ राज; प्रशासक नियुक्तीचे अधिकार सीईओंना

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे आणि प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका घेणे शक्य झाले नाही, अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार आता राज्य सरकारने संबंधित...