बारामती | Baramati
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हा घातपात असल्याची शंका व्यक्त, करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हे प्रकरण उचलून धरले असून एफआयआर दाखल करून घेण्यासाठी थेट बारामती गाठली. जिथे दोन तास पोलिसांची चर्चा केल्यानंतर एफआयआर दाखल का करून घेता येणार नाही, पोलिसांनी यावर कोणती भूमिका मांडली, याबाबत खंत व्यक्त करणारी भूमिका माध्यमांशी संवाद साधला.
आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातावरून एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. “या अपघातामागे नक्कीच कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे,” असे म्हणत रोहित पवारांनी अपघाताची तांत्रिक बाबींबरोबरच गुन्हेगारी अंगानेही तपासणी केली जावी, अशी मागणी केली आहे. बारामती पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी पोहोचले. तिथे त्यांनी आपली बाजू मांडल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी वेळ मागून घेतला. यानंतर माध्यमांशी बोलत असताना रोहित पवार यांनी खळबळजनक दावे केले.
यावेळी, पोलिस रोहित पवारांची एफआयआर दाखल करून घेत नसल्याने रोहित पवार आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. तर आमची केस खोटी आहे आमचा एफआयआर खोटा आहे असे सांगा मग, आम्हाला एफआयआर तरी द्या नाहीतर मी खोटं एफ आय आर करतोय म्हणून माझ्यावरती कारवाई करून टाका, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यात कबुतरांवर गुन्हे दाखल होतात पण,…
“राज्यात पुण्यातील कबुतरे चोरीला गेल्याचा एफआयआर दाखल होतो, परंतु राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या संशयास्पद मृत्यूचा एफआयआर दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत,” अशा जळजळीत शब्दांत आमदार रोहित पवार यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनावर निशाणा साधला. बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये १०० हून अधिक वकिलांसह दोन तास ठाण मांडून बसल्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.
बारामती माझा श्वास आहे, तो कधीच थांबणार नाही…; बारामती पोलिस स्टेशनबाहेर समर्थकांची मोठी गर्दी
रोहित पवार म्हणाले की, काल मुंबईत आणि आज बारामतीत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. “आम्ही सर्व कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे नियम सांगितले, तरीही पोलीस एफआयआर घेण्यास तयार नाहीत. बारामती पोलिसांचे हात कुणीतरी बांधले आहेत,” असा दावा त्यांनी केला. VSR कंपनी आणि बड्या नेत्यांचे लागेबांधे असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
यावेळी रोहित पवार यांनी थेट ‘उड्डयण’ मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी आरोप केला की, VSR कंपनीचे महाराष्ट्रातील एका बड्या नेत्यासह केंद्रीय एव्हीएशन मंत्र्यांशी जवळचे संबंध आहे. डीजीसीएने दोन दिवसांपूर्वीच व्हीएसआरची ५ विमाने ग्राऊंडेड केली आहेत. जर ही विमाने ग्राऊंड करण्यात आली असतील तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सदोष विमान चुकून दिले की, जाणूनबुजून दिले? याचा तपास करणे आवश्यक आहे”, असेही रोहित पवार म्हणाले.
“ब्लॅक बॉक्स सुरक्षित!” — AAIB, DGCA च्या अहवालाबाबत अजित दादांच्या निकटवर्तीयांची मोठी माहिती
आम्ही मागणी करत असलेला एफआयआर हा व्हीएसआर कंपनीविरोधात आहे. तसेच विमानाच्या उड्डाणाला परवानगी ज्या यंत्रणेने दिली, त्या डीजीसीएच्या अधिकाऱ्यांविरोधात आम्ही तक्रार दिली आहे. डीजीसीएमधील कोणत्या अधिकाऱ्यांनी याला परवानगी दिली? या अधिकाऱ्यांना शोधण्यासाठी दुसरा एफआयआर दाखल करण्याची आमची मागणी असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याच्या मृत्यूच्या मुद्याचे उदाहरण देत रोहित पवार यांनी काही सवाल उपस्थित केले. अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला न्याय का मिळत नाही, असा प्रश्न विचारत करत त्यांनी संताप व्यक्त केला. काही वर्षापूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केली की काय , तो गेला हे सगळ दुर्दैवी होते. तो मुंबईत रहात होता, पण तो काही महाराष्ट्राचा नव्हता. पण तरीही त्याच्या मृत्यूच्या मुद्यावरून एवढं रान उठवण्यात आले, चौकशीची मागणी झाली. मग अजित दादा हे तर महाराष्ट्राचे एवढे मोठे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री होते, मग त्यांच्या सारख्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यावरही एफआयआर का घेतला जात नाही? त्यांना न्याय का मिळत नाही ? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
Sanjay Raut: “अजित पवारांचा मृत्यू अपघात नाही, सदोष मनुष्यवध!” —संजय राऊतांचा गंभीर आरोप
त्यांच्या मृत्यूला महीना होत आलाय, तरी इतक्या दिवसात काहीच का झाले नाही? या इन्व्हेस्टिगेशनवर कोणाचा तरी दबाव असल्यामुळेच हा तपास योग्य दिशेन जात नाहीय़े, असा आरोपही रोहित पवार यांनी केला.





