Thursday, May 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तारिख कोणी ठरवली? मुख्यमंत्र्यांचा पहिल्यांदाच खुलासा, म्हणाले, माझा कुठलाही...

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तारिख कोणी ठरवली? मुख्यमंत्र्यांचा पहिल्यांदाच खुलासा, म्हणाले, माझा कुठलाही आक्षेप…

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या काळात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अनेक चर्चा देखील समोर आले. अजित पवार-शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांच्या बैठकीचा व्हिडिओही व्हायरल झाला. त्यात सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी इतकी घाई का करण्यात आला? यावरून विरोधकांनी टीका देखील केली, त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीचा होता. तो आम्ही घेतला नव्हता असं सांगत मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्याबाबत जो निर्णय घेतला गेला त्यात आमच्या पक्षाचा सहभाग नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते नेत्यांनी मला माहिती दिली. कागदपत्रांसह ते नेते माझ्याकडे आले आणि त्यांनी एक तारीख दिली. त्यावर माझा कुठलाही आक्षेप नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केली आणि ते आम्ही मान्य केले. तो निर्णय हा त्यांच्या पक्षाचा होता, आमचा निर्णय नव्हता असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

कोट्यावधींच्या नोटा घेऊन जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, व्हिडीओ व्हायरल

तसेच, विलीनीकरणाबाबत बैठकीचा व्हिडिओ समोर आला त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पक्षात विलीनीकरणाची चर्चा सुरू होती तर त्याच्याशी आमचा संबंध नव्हता. जर असा निर्णय झाला असता तर अजितदादांना आमचा सल्ला घ्यावा लागला असता कारण आम्ही मित्रपक्ष आहोत. परंतु माझ्यासोबत अजितदादांची अशी कुठलीही चर्चा झाली नव्हती. जर काही सीक्रेट असेल तर त्याबाबत माहिती नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही; अजितदादांना जाऊन महिना झाला, रोहित पवारांची भावनिक पोस्ट

दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करत आहेत. DGCA याचा शोध घेत आहे. आम्हीही सीआयडीकडे याची चौकशी दिली आहे. त्याशिवाय कुटुंबाच्या सांगण्यावरून आम्ही सीबीआयलाही पत्र लिहिले आहे. जर कुठलीही शंका अथवा काही माहिती असेल तर त्या तपासणीसाठी डीजीसीएकडे पाठवण्यात याव्यात. ही एक संवेदनशील बाब आहे. जेव्हा चौकशी सुरू असते तेव्हा अनुमान लावणे योग्य नाही. आपण मृत व्यक्ती आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा आदर केला पाहिजे असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांच्या आरोपावर भाष्य करणे टाळले.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : तेरा हजार व्हिडिओ डिलीट; SIT कडून दोन...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि भक्तांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या स्वयंघोषित अशोक खरात (Ashok Kharat) याच्या...