Monday, July 27, 2026
Homeदेश विदेशकोट्यावधींच्या नोटा घेऊन जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, व्हिडीओ व्हायरल

कोट्यावधींच्या नोटा घेऊन जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दक्षिण अमेरिकन देश बोलिव्हिया येथे शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे. राजधानी ला पाजजवळील एल अल्टो शहरात बोलिव्हिया एअरफोर्सचं हरक्यूलिस सी १३० या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, एल अल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेताच काही वेळातच जवळ असलेल्या दाट लोकवस्तीच्या परिसरातील एका वर्दळीच्या रस्त्यावर हे विमान कोसळले. विमान कोसळल्यामुळे रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक बसली. तसेच विमानाचे अवशेष पसरल्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

- Advertisement -

विमान कोसळल्यानंतरचे भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्या घटनेचा अन् तेथील परिस्थितीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फुटेजमध्ये गोंधळलेले दृश्य दिसून आले. अपघाताच्या ठिकाणी गर्दी जमली होती, काही लोक रस्त्यावर विखुरलेल्या नोटा गोळा करताना दिसत होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी पाहणाऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याच्या नळीचा वापर करताना पाहिले.

नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही; अजितदादांना जाऊन महिना झाला, रोहित पवारांची भावनिक पोस्ट

स्थानिक यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील केबिन क्रू आणि रस्त्यावरील सामान्य नागरिकांचा या अपघातात मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, अपघातग्रस्त विमान देशाच्या अंतर्गत भागात चलन घेऊन जात होते असे बोलिव्हियाच्या संरक्षण मंत्रालयाचा हवाला देत स्थानिक वृत्तपत्रांनी माहिती दिली आहे. त्याशिवाय अपघातानंतर एल अल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे तसेच अपघातग्रस्त विमान आमच्या ताफ्याचा भाग नव्हते असे राष्ट्रीय विमान कंपनी बोलिव्हियाना डी एव्हिएसिओनने एका निवेदनात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

जनता

कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E20 जनता पार्टीचा उदय; काय आहे E20...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकॉकरोच जनता पार्टीने (Cockroach Janta Party) नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले आणि थेट शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांना...