मुंबई | Mumbai
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीतील आंदोलनाला राजकीय वळण मिळत असल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षांसह कॉकरोच जनता पार्टी (CJP) कडूनही ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. या संपुर्ण घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहे. SIR प्रक्रियेवरुन सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल २ कोटी मतदारांचे नावे वगळण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या संतापात आणखी भर पडली आहे. अशातच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संदर्भातील एक सविस्तर पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असलेले गैरसमज आणि त्याची नेमकी वस्तूस्थिती याबाबतची माहिती लिहिली आहे.
काय आहे फडणवीसांची पोस्ट?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मतदारयादीतील नाव, पत्ता आणि इतर तपशील आजच तपासा! SIR प्रक्रियेबाबतचे गैरसमज दूर करा, योग्य माहिती जाणून घ्या आणि आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा!” असे आवाहन केले आहे.
❌ गैरसमज: SIR मध्ये पात्र मतदारांची नावे सरसकट वगळली जातात.
✅ वस्तुस्थिती: SIR चा उद्देश मतदारयादी अद्ययावत करणे आहे. आपले नाव तपासा; चुकीने वगळले असल्यास दुरुस्तीसाठी अर्ज करा.
❌ गैरसमज: मतदारयादीत नाव नसेल, तर पुन्हा समाविष्ट करता येत नाही.
✅ वस्तुस्थिती: पात्र नागरिक Form 6 द्वारे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात. नोंदणी प्रलंबित ठेवू नका.
❌ गैरसमज: प्रत्येक मतदाराला कागदपत्रांसाठी कार्यालयात जावे लागते.
✅ वस्तुस्थिती: काही प्रकरणांत BLO मार्फत कागदपत्रे देता येतात; आवश्यक असल्यास सुनावणीला उपस्थित राहावे लागू शकते. अधिकृत सूचनांकडे दुर्लक्ष करू नका.
मतदारयादीतील नाव, पत्ता आणि इतर तपशील आजच तपासा! SIR प्रक्रियेबाबतचे गैरसमज दूर करा, योग्य माहिती जाणून घ्या आणि आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा!
❌गैरसमज: SIR मध्ये पात्र मतदारांची नावे सरसकट वगळली जातात.
✅ वस्तुस्थिती: SIR चा उद्देश मतदारयादी अद्ययावत करणे आहे. आपले नाव तपासा; चुकीने वगळले असल्यास दुरुस्तीसाठी अर्ज करा.❌ गैरसमज: मतदारयादीत नाव नसेल, तर पुन्हा समाविष्ट करता येत नाही.
✅ वस्तुस्थिती: पात्र नागरिक Form 6 द्वारे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात. नोंदणी प्रलंबित ठेवू नका.❌ गैरसमज: प्रत्येक मतदाराला कागदपत्रांसाठी कार्यालयात जावे लागते.
✅ वस्तुस्थिती: काही प्रकरणांत BLO मार्फत कागदपत्रे देता येतात; आवश्यक असल्यास सुनावणीला उपस्थित राहावे लागू शकते. अधिकृत सूचनांकडे दुर्लक्ष करू नका.❌ गैरसमज: नाव समाविष्ट किंवा वगळण्याचा निर्णय AI आपोआप घेतो.
✅ वस्तुस्थिती: AI साधने समान नोंदी ओळखण्यास मदत करतात; वैधानिक निर्णय ERO घेतो. आपल्या नोंदी तपासणे महत्त्वाचे आहे.❌ गैरसमज: एकाच व्यक्तीची नावे अनेक ठिकाणी असली तरी चालतात.
✅ वस्तुस्थिती: कायद्यानुसार दुबार नोंदींना परवानगी नाही. आपल्या नोंदींची अचूकता तपासा.❌ गैरसमज: नवीन मतदारांना SIR पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते.
✅ वस्तुस्थिती: पात्र नागरिक निर्धारित पात्रता दिनांकानुसार Form 6 द्वारे अर्ज करू शकतात.❌ गैरसमज: मतदारयादीतील चुकीचे तपशील दुरुस्त करता येत नाहीत.
✅ वस्तुस्थिती: नाव, पत्ता किंवा इतर तपशील दुरुस्त करण्यासाठी Form 8 द्वारे अर्ज करा.❌ गैरसमज: मतदारयादीतील निर्णयाविरोधात अपील करता येत नाही.
✅ वस्तुस्थिती: लागू नियमांनुसार अपील करता येते. मदतीसाठी अधिकृत पोर्टल किंवा 1950 हेल्पलाइनचा वापर करा.आपले नाव मतदारयादीत आहे का? आजच तपासा. पात्र मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा!
#Maharashtra #SIR #ElectionCommission— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 14, 2026
❌ गैरसमज: नाव समाविष्ट किंवा वगळण्याचा निर्णय AI आपोआप घेतो.
✅ वस्तुस्थिती: AI साधने समान नोंदी ओळखण्यास मदत करतात; वैधानिक निर्णय ERO घेतो. आपल्या नोंदी तपासणे महत्त्वाचे आहे.
❌ गैरसमज: एकाच व्यक्तीची नावे अनेक ठिकाणी असली तरी चालतात.
✅ वस्तुस्थिती: कायद्यानुसार दुबार नोंदींना परवानगी नाही. आपल्या नोंदींची अचूकता तपासा.
❌ गैरसमज: नवीन मतदारांना SIR पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते.
✅ वस्तुस्थिती: पात्र नागरिक निर्धारित पात्रता दिनांकानुसार Form 6 द्वारे अर्ज करू शकतात.
❌ गैरसमज: मतदारयादीतील चुकीचे तपशील दुरुस्त करता येत नाहीत.
✅ वस्तुस्थिती: नाव, पत्ता किंवा इतर तपशील दुरुस्त करण्यासाठी Form 8 द्वारे अर्ज करा.
MPSC पेपरफुटी वादानंतर सचिव बदलले; IAS सौरभ कटियार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
❌ गैरसमज: मतदारयादीतील निर्णयाविरोधात अपील करता येत नाही.
✅ वस्तुस्थिती: लागू नियमांनुसार अपील करता येते. मदतीसाठी अधिकृत पोर्टल किंवा 1950 हेल्पलाइनचा वापर करा.
अशी सविस्तर माहिती फडणवीसांनी पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. तर, “आपले नाव मतदारयादीत आहे का? आजच तपासा. पात्र मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा!” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमधून म्हटले आहे.




