Monday, August 31, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSamay Raina: कारण मला तिथून अनेकदा फोन येतात...; समय रैनाची मुख्यमंत्र्यांसमोर सायबर...

Samay Raina: कारण मला तिथून अनेकदा फोन येतात…; समय रैनाची मुख्यमंत्र्यांसमोर सायबर सेलवर टोलेबाजी

मुंबई | Mumbai
राज्य पोलिसांच्या सायबर विभागाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) लघुपट (short film) आणि ‘सायबर अँथम’ (सायबर जनजागृती करणारे गीत) यांचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला कॉमेडियन आणि युट्युबर समय रैना (Samay Raina) हा देखील उपस्थित होता आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्याच्या मिश्कील अंदाजामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. समय रैनाने महाराष्ट्र सायबर सेलसोबतच्या आपल्या जुन्या ‘नात्या’चा उल्लेख करत अधिकाऱ्यांचीच मजेशीर पद्धतीने फिरकी घेतली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

- Advertisement -

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चित्रपट, संगीत आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.या उपक्रमात योगदान दिल्याबद्दल अभिनेता आशिष विद्यार्थी, पंकज त्रिपाठी, शरद केळकर, सोनाली बेंद्रे, जावेद जाफरी, मंगेश देसाई, गायिका सुनिधी चौहान आणि कॉमेडियन समय रैना यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

माझ आणि सायबर सेलचं जून नातं
या कार्यक्रमादरम्यान समय रैनाने आपल्या खास विनोदी शैलीत भाषण केले. महाराष्ट्र सायबर सेलशी आपलं जुनं नातं असल्याचे सांगत त्याने उपस्थितांमध्ये हशा पिकवला.समय रैना म्हणाला, “सत्काराबद्दल खूप धन्यवाद. माझं आणि महाराष्ट्र सायबर सेलचं नातं खूप जुनं आहे. महाराष्ट्र सायबर सेल खूप अॅक्टिव्ह आहे. तुम्ही कुठेही असाल, भारतात किंवा अमेरिकेत, ते तुम्हाला पकडतात.”

यानंतर त्याने 1930 या सायबर हेल्पलाइन क्रमांकाबद्दलही विनोद केला. “1930 हा खरोखरच खूप चांगला नंबर आहे. मी तो सेव्ह करून ठेवला आहे, कारण मला तिथून अनेकदा फोन येतात,” असे म्हणत त्याने पुन्हा एकदा उपस्थितांना हसवले.

Narhari Zirwal: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी देखील…; नरहरी झिरवाळांचा आंदोलक विद्यार्थ्यांना अजब सल्ला

बिस्किट घेऊ का?
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समय रैनाचा सत्कार करण्यात आला, तेव्हा त्याने आणखी एक गोष्ट केली. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवलेले बिस्किट्स समय रैनाने पाहिले आणि मी एक बिस्किट्स घेऊ का? अशी विचारणा फडणवीस यांच्याकडे केली. समय रैनाच्या या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनीही होकार दिला. समय रैनाने बिस्किट्स उचलेले आणि तो माघारी परतला. मात्र समय रैनाच्या या कृतीने देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्याठिकाणी उपस्थित सगळ्यांनाच हसू आले.

डिजिटल अरेस्ट नावाची गोष्ट अस्तित्वात नाही
कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. सायबर फसवणूक झाल्यानंतरचा लगेचचा काळ ज्याला ‘गोल्डन अवर’ किंवा अत्यंत महत्त्वाचे सुरुवातीचे तास म्हटले जाते, हा गमावलेला पैसा परत मिळवण्यासाठी अत्यंत मोलाचा असतो. या काळात तक्रार दाखल केल्यास व्यवहार थांबवण्याची किंवा फसवणूक झालेली रक्कम परत मिळवण्याची शक्यता अधिक असते, असे फडणवीस यांनी नमूद केले. तसेच फसवणुकीनंतर उशीर झाल्यास पैसे परत मिळवणे अत्यंत कठीण होते, कारण अनेकदा ती रक्कम विविध बँक खात्यांमधून फिरवली जाते. त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे, हे लक्षात येताच 1930 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : समृद्धी महामार्ग दरोड्याप्रकरणी सात जण गजाआड; नाशिक...

0
नाशिक | Nashik सिन्नर तालुक्यात (Sinnar Taluka) समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) प्रवाशांना लुटणाऱ्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) अवघ्या ४८ तासांत...