Tuesday, July 28, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime News : महिलेवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातला 'या' तारखेपर्यंत...

Ashok Kharat Crime News : महिलेवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातला ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

नाशिक | Nashik

नाशिक गुन्हे शाखेने (क्राईम ब्रांच) आज (बुधवारी) एका ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अशोक खरात(Ashok Kharat) उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ला अटक केली होती. खरातच्या अटकेनंतर पोलिसांनी (Police) त्याच्या विविध ठिकाणांवर शोध मोहीम राबवली असता तपासात तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. खरात यास अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. चौकशीनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime : मंत्र्यांचे भविष्य सांगणाऱ्या ‘स्वघोषित कॅप्टन’ला लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अटक; पोलिसांना सापडले तब्बल ५८ व्हिडीओ

अशोक खरातला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवार (दि.२४ मार्च) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्याच्या नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयावर छापा टाकला असता या छाप्यात महत्त्वाचे पुरावे आणि काही धक्कादायक व्हिडीओ आढळले आहेत. या व्हिडीओमध्ये नामांकित महिला तसेच सेलिब्रिटी, वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांची माहिती असल्याचे बोलले जाते. सध्या पोलीस या जप्त केलेल्या व्हिडिओंची सखोल चौकशी करत असून, यातून अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ शकते.

हे देखील वाचा : Nashik Ashok Kharat Crime : सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केल्यानंतर रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मला कल्पना…”

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांनी माहिती देतांना सांगितले की, सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल झाला असून, गुन्हे शाखा युनिट एककडून तपास सुरु आहे. महिलेने अशोक खरात याच्याविरुद्ध शारीरिक शोषणाची तक्रार दिल्यांनतर त्याआधारे गुन्हा दाखल करुन तपास सुरु आहे. आज तपासाचा पहिला दिवस असून,खरात याच्याविरुद्ध आतापर्यंत एकाच महिलेने तक्रार दिली असून, आणखी काही महिला तक्रारीसाठी पुढे येऊ शकतात असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : अत्याचाराचे आरोप असलेल्या अशोक खरातची बड्या नेत्यांसोबत उठबस; फोटो आले समोर

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला सर्वाधिक 255 रुपये किलोचा भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 7139 कॅरेटची आवक...