नाशिक | Nashik
भारत विरुद्ध श्रीलंका संघात गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्ध १६५ धावांनी दणदणीत विजय मिळवला (India Beats Sri Lanka in Test Match) आहे. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने विजयी सलामी दिली आहे. भारताच्या भेदक माऱ्यापुढे यजमान संघाचा डाव २०६ धावांवर आटोपला. पाचव्या दिवसाच्या रोमांचक सामन्यामध्ये मानव सुथार याने एकाच षटकांत तीन विकेट्स घेतल्या अन् भारताचा मॅच जिंकून दिली.
भारताने पहिल्या डावात 462 धावा केल्या. देवदत्तने पहिल्या इनिंगमध्ये १६७ धावा केल्या तर दुसऱ्या डावात ४४ धावांची संयमी खेळी केली होती. त्याच्या संयमी आणि आक्रमक फलंदाजीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. केएल राहुलने ८१ धावा, ध्रुव जुरेलने ५१ धावा, तर ऋषभ पंतने ३९ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने ४ विकेट घेतल्या, तर केशरा नुवान्थाने ३ फलंदाजांना बाद केले.
खासदार संजय राऊतांचा निवडणुक आयोगावर गंभीर आरोप, म्हणाले, पक्ष आणि चिन्ह…
दुसऱ्या डावात पंत चमकला
भारताने दुसऱ्या डावात 193 धावा केल्या. भारतासाठी ऋषभ पंतने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 69 चेंडूंमध्ये आठ चौकार आणि दोन षटकारांसह 66 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलनेही 44 धावा केल्या. यशस्वी जैस्वालला आपले खाते उघडता आले नाही. केएल राहुलने पडिक्कलसोबत 65 धावांची भागीदारी केली. राहुल 35 धावांवर बाद झाला. कर्णधार शुभमन गिल विशेष प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आणि आठ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
श्रीलंकेची अडखळत सुरवात
श्रीलंकेने ८४-४ वरून दिवसाचा खेळ सुरू केला. सोनल दिनुषा ने कर्णधार धनंजय डिसिलवा सोबत ९५ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचून संघाला १४० चा टप्पा ओलांडून दिला. धनंजय डिसिलवा ५९ धावा काढून तंबूत परतला. त्याच्या पाठोपाठ यष्टीरक्षक फलंदाज निरोशन डिकवेला १० धावा काढून तंबूत परतला. केशरा नुवानाथा ने सोनल दिनुषाला हाताशी धरून ४३ धावांची भर घालून संघाची धावसंख्या १९९ पार नेली. विशेष म्हणजे संघाच्या इतर ६ फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नसल्याने श्रीलंका २०६ धावांवर गारद झाली.
मानव सुतारच्या फिरकीत श्रीलंकेचे फलंदाज अडकले
भारताकडून मानव सुथारने सर्वाधिक ४ विकेट्स घेत श्रीलंकेच्या फलंदाजांना माघारी धाडले. रवींद्र जडेजाने ३ विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताने पहिल्या डावात केलेल्या 462 धावांच्या जोरावर तब्बल 178 धावांची आघाडी मिळवली आहे.
दरम्यान, भारताने दिलेल्या 372 लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने दुसऱ्या डावात चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलंदाजांनी निर्णायक क्षणी विकेट्स मिळवत श्रीलंकेला पुनरागमनाची संधी दिली नाही. मानव सुथारने पुन्हा एकदा प्रभावी गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने 2 विकेट्स मिळवल्या. अखेर श्रीलंकेचा संपूर्ण डाव 206 धावांवर संपला आणि भारताने सामना 165 धावांनी जिंकला.




