नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. बांगलादेशातील २०२४ च्या राजकीय उलथापालथीच्या धर्तीवर भारतात सत्ताबदल घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. युवकांच्या ऊर्जेचा वापर विधायक कामांसाठी करण्याऐवजी राजकीय संघर्ष आणि अराजकता निर्माण करण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लखनऊ येथे शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत बोलताना राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील आंदोलन हे केवळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी किंवा मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेपुरते (SIR) मर्यादित नसल्याचे म्हटले. विरोधकांचा उद्देश लोकशाही संस्थांना कमकुवत करणे आणि देशात अस्थिरता निर्माण करणे असल्याचा दावा त्यांनी केला.
देशातील युवकांना भडकावले जात आहे
पत्रकार परिषदेत राजनाथ सिंह म्हणाले की, ज्याप्रकारे देशातील युवकांना भडकावले जात आहे. त्यातून विरोधकांचा एकमेव अजेंडा लोकशाहीतील घटनात्मक संस्थांना कमकुवत करून देशात आग भडकवण्याचा आहे हे स्पष्ट होते. दिल्लीत मागील काळात जे काही घडले त्यावरून सिंह यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष युवकांना पुढे करून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला.
मालेगाव डोंगराळे चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरण: आरोपी विजय उर्फ शेखर खैरनारला फाशीची शिक्षा
घटनात्मक संस्थांच्या विश्वासार्हतेला कमी लेखण्याचा प्रयत्न
तसेच लोकशाही म्हणजे अराजकता पसरवण्याचा, घटनात्मक संस्थांच्या विश्वासार्हतेला कमी लेखण्याचा किंवा भारताच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा परवाना नाही हे राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. सुप्रीम कोर्टाची कालची टिप्पणीसुद्धा याच गोष्टीकडे निर्देश करते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कायद्याचा आदर करणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या रक्षणाच्या नावाखाली विघातक राजकारण करण्याऐवजी राहुल गांधींनी जनमताचा आदर राखून आपल्या राजकीय भूमिकेवर आत्मपरीक्षण केले पाहिजे. हा माझा राहुल गांधींना सल्ला आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.
कांग्रेस और उसके सहयोगियों की ‘Regime Change’ की बातों से उनकी मंशा स्पष्ट होती है। युवाओं की ऊर्जा को राष्ट्र निर्माण में लगाने के बजाय उन्हें अराजकता की राजनीति का मोहरा बनाया जा रहा है। चुनाव सुधार के नाम पर लोकतांत्रिक संस्थाओं को कमजोर कर किसी भी तरह सत्ता हासिल करना ही इनका असली एजेंडा है।— Rajnath Singh (@rajnathsingh) October 16, 2026
बांगलादेशातील घटनांच्या धर्तीवर काही लोक सत्तापालट घडवून आणण्याचा प्रयत्न
“बांगलादेशातील घटनांच्या धर्तीवर काही लोक सत्तापालट घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. एका पत्रकार परिषदेत एका व्यक्तीने हे उघडपणे म्हटलंही आहे. त्यामुळे यावरून हे स्पष्ट होतं आहे की त्यांचा एकमेव अजेंडा लोकशाही संस्था उद्ध्वस्त करणं आणि देशाला आगीच्या ज्वाळांत लोटणं हाच आहे. सत्तापालट या सारख्या शब्दांचा वापर हेच दर्शवत आहे की त्यांचा संघर्ष निवडणुकीच्या सुधारणांबाबत किंवा एसआयआरबाबत किंवा ज्ञानेश कुमारांच्या विरोधात नाहीये. त्यांची ही लढाई देशातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील नाही. उलट त्यांची ही लढाई देशात अराजकता निर्माण करून सत्ता हस्तगत करण्यासाठी हा एक कट आहे”, असा गंभीर आरोप मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे.




